पत्रकारांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच पत्रकार सुरक्षा कायदा करणर असल्याची माहिती केंर्दीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
जावडेकर म्हणाले,पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी देशभर होत असून सरकार पत्रकारांच्या मागणीची दखल घेऊन कायदा करेल.अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात जावडेकर म्हणाले,दूरदर्शनची लोकप्रियता वाढविण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील.
भूमिकेचे स्वागत
———-
पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा यामागणीसाठी राज्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली गेली चार वर्षे आंदोलन करीत आहेत मात्र राज्य सरकारने पत्रकारांच्या मागणीला पानेच पुसली.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कायदा करण्याची भूमिका घेत असेल तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे.सरकारने हा कायदा येत्या अधिवेशनातच करावा अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे.