रायगड जिल्हयात गेली चार दिवस समुद्र खवळलेला असून किनाऱ्याला लाटांचे तडाखे बसत आहेत.या तडाख्यांनीच मांडव्याहून मुंबईसाठीच्या जलप्रवासात महत्वाची भूमिका बजावणारी 40 वर्षे जुनी असलेली मांडवा जेट्टी कोसळली आहे.सध्या मंाडवा ते मुंबई जलवाहतूक बंद असल्याने कोणताही अपघात झाला नाही.
60 लाख रूपये खर्च करून 1974मध्ये बांधलेल्या मांडवा जेट्टीने गेली 40 वर्षे अलिबागला मुंबईशी जोडण्याचे काम केले.अखेर लाटांच्या तडाख्यापुढं या जेट्टीचा निभाव लागला नाही.ती काल कोसळली.ही जेट्टी जुनी झालेली आहे हे लक्षात घेऊन मांडवा येथे साडेसहा कोटी रूपये खर्च करून नवी जेट्टी उभारण्यात आली आहे.या जेट्टीवरून आता दररोज किमान दहा हजार प्रवासी मुंबई-मांडवा प्रवास करीत असतात.जुनी जेट्टी कोसळल्याने प्रवाशी वाहतुकीस अडचण येणार नसली तरी प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता मांडवा येथे आणखी एक पर्य़ायी जेट्टी उभारावी लागेल असे बोलले जाते.