दैनिक देशोन्नतीचे पत्रकार विनोद कळस्कर यांच्यावर अकोला तालुक्यातील वडद बुद्रूक येथे शनिवारी रात्री ११ वाजता वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दहिहांडा पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून, इतर दहा ते बारा हल्लेखोर फरार झाले आहेत. महसूल प्रशासनाच्या अधिकार्यांवर हल्ला करणारे वाळूमाफिये आता बेफाम झाले असून, विरोधात बातम्या छापणार्या व त्यांना जाब विचारणार्या पत्रकारांच्या जिवावर उठले आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा तीवर् शब्दात निषेध केला असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
(Visited 91 time, 1 visit today)