एन.एच.-17वर 287 बळी

0
1142

मुंबई-गोवा महामार्गाच्या संपूर्ण चौपदरीकरणासाठी महाराष्ट्राचे एक शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय मंत्र्यांची भेट ेघेईल असे आश्वासन महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी काल विधान परिषदेत दिले आहे.या घोषणेचे कोकणातील पत्रकारांनी स्वागत केले आहे.या महामार्गाचे चौपदरीकऱण व्हावे यामागणीसाठी कोकणातील फत्रकारांनी 25 जून रोजी कशेडी घाट रोको आंदोलन जाहीर केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकऱण रखडल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.गेल्या वर्षी या महमार्गावर 287 जणांचे बळी गेले आहेत.या पार्श्वभूमीवर चौपदरीकऱणाचे काम त्वरित व्हावे अशी पत्रकारांची मागणी असून त्यासाठी पत्रकार आंदोलन करीत आहते.
रायगड जिल्हयातील पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मीटऱ्च्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम 33 ट्‌क्के पूर्ण झाले असून उवर्र्रित काम प्रगतीपथावर असल्याचे आर.आर.पाटील यांनी सभागृहात सागितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here