रायगड जिल्हयात खालापूरमध्ये पोलिसांतर्फे आयोजित एका मुजरा पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 14 पुरूषांसह 12 मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी काल रात्री ही कारवाई केली.
सुरेश पवार या पोलिस अधिकाऱ्याच्या निवृत्तीनिमित्त ही मुजरा पार्टी आयोजित कऱण्यात आली होती.खालापूरजवळच्या कोलथेम गावाच्या हद्दीतील एका फार्महाऊसवर ही पार्टी सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई कऱण्यात आली.या पार्टीमध्ये अंमलीपदार्थांचा वापर झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.पकडलेल्या व्यक्ती आणि मुलींची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
2012मध्ये पोलिसांनी खालापूरनजिकच एका हॉटेलवर धाड टाकून रेव्ह पार्टी उधळून लावली होती.त्या प्रकरणात 290 जणाना ताब्यात घेण्यात आले होते.आता चक्क पोलिसांच्या पार्टीवरच पोलिसानी धाड टाकल्याने हा विषय रायगडात चर्चेचा झाला आहे.