मुंबईतील एका मराठी दैनिकाच्या पत्रकार तरूणीनं आरोप केला आहे की,एका तरूणानं आपल्याला लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर वारंवार बलात्कार केला आहे.पार्कसाईट पोलिस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीनुसार संबंधित तरूणाच पत्रकार तरूणीशी गेल्या वर्षी परिचय झाला.त्याने लग्नाचं आमिष दाखवून तरूणीशी संबंध ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला.अशा पत्रकार तरूणीचा आरोप आहे.पीएसआय जेपीपाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार सदर तरूण परभणी जिल्हयातील असून तो एका माध्यम समुहाच्या जनसंपर्क विभागात काम करतो.या संबंंधिची तक्रार 15 मे रोजीच दाखल केली गेली आहे.सदर तरूणाने अटकपूर्व जामिन मिळावाम म्हणून या तरूणाने प्रयत्न सुरू केले असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.