आजची माध्यमं केवळ कार्पोरेट कंपन्यांच्या इशाऱ्यावर काम करीत असून ती जनतेपासून तूटत चालली आहेत अशी खंत ज्येष्ट पत्रकार पी.साईनाथ यांनी व्यक्त केली आहे.
असोसिएशन ऑफ इलेक्टॉनिक मिडियाच्यावतीनं पुण्यात आयोजित चौथ्या व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.कार्पोरेट कंपन्या आणि माध्यमातील साट्यालोट्यावर त्यांनी नेमके बोट ठेवले.ते म्हणाले,माध्यमातील आशय ,संस्कृती आणि जबाबदारीची भावना आणि नैतिकता हरवत चालली आहे.पुढे ते म्हणाले,तुमचे कष्ट विका पण तुमचा आत्मा शाबूत ठेवा.
पेड न्यूजवरही साईनाथ यांनी भाष्य केलं.ते म्हणाले,माध्यामांवरील लोकांच्या विश्वासालाच घाला घालणारा तो प्रकार आहे.ते म्हणाले,एक काळ असा होता की,माध्यमं उद्योग जगताच्या बाजुची आहेत म्हणून ओळखली जात मात्र आज माध्यमंच एक उद्योग म्हणून समाजात उभी ठाकली आहेत.हा बदल दुदैवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.इंटरनेटच्या अतिरिक्त वापराबद्दल त्यांनी युवा पिढीला सावध केले.ते म्हणाले,पारंपारिक माध्यमांपेक्षा केवढी तरी मोठी एकाधिकारशाही निर्माण करण्याची अनिर्बंध ताकद इंटरनेट या माध्यमात आहे.तुमच्या व्यक्तिगत माहितीचा वाट्टेल तसा वापर करू शकण्याची ताकद त्यांच्यात आहे.