संपादक राम पटवर्धन याचे निधन

0
780

सत्यकथा या प्रख्यात मासिकाचे माजी संपादक राम पटवर्धन यांचे आज (3 जून 2014) ठाणे येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. 
अत्यंत साक्षेपी संपादक, व मौज प्रकाशनाचे संपादक, प्रकाशक श्री. पु, भागवत यांच्या मूशीत व संस्कारात वाढलेले. 
अत्यंत अभ्यासू, निगर्वी, आणि सडेतोड संपादक. राम पटवर्धन व श्री. पु, भागवत यांच्या संपादनाचा संस्काराने अक्षरशः अनेक लेखक तयार झाले. त्यांनी अनुवाद केलेले पाडस म्हणजे मास्टरपिस आहे.
मराठी विषय सर्व शाळेंत, विद्यापीठात शिकवला जातो, पण सत्यकथा व मौजचे संपादक भागवत-पटवर्धन हे एक नामांकीत विद्यापीठच होते.
मौज प्रकाशनाचे संचालक, कर्मचारी यांनी ठाणे येथील शाकुंतल सोसायटीमध्ये जाउन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here