२१मे १९९१चा तो दिवस मला आजही आठवतो.मी तेव्हा नांदेडच्या लोकपत्रमध्ये वृत्तसंपादक होतो.फेब्रुवारीमध्येच अंक सुरू झाला होता.अजून घडी बसायची होती.टेक्निकल अडचणीही जाणवत होत्या.त्यातच २१ तारखेला रात्री आठच्या सुमारास काॅम्प्यूटर सिस्टिम बंद पडली.गावात अन्यत्र काही व्यवस्था होण्यासारखी नव्हती.अंक काढायचा कसा या विवंचनेत मी होतो.तातडीनं एमजीएममधील एक इलेक्टाॅनिक टाईपराईटर मागविले.परंतू लगेच त्याच्या मयार्दा लक्षात आल्या.त्यामुळं उद्याचा अंक आता निघत नाही याची खात्री मला झाली.आमची सारी धावपळ सुरू असतानाच अकराच्या सुमारास राजीव गांधी यांची हत्त्या झाल्याची बातमी पीटीआयनं दिली.पीटीआय पाहणारा उपसंपादक तो टेक घेऊन माझ्याकडं आला.बातमी वाचून मी गारठूनच गेलो.उद्याचा अंक महत्वाचा होता.आपण तो दिला नाही तर राजीव गांधी गेल्यामुळं मुद्दाम अंक दिला नाही असाही समज होऊ शकतो.डोकं काम करीत नव्हत.अचानक एक कल्पन क्लिक झाली.अंक हातानं लिहून काढायचा असं ठरलं. रोजचा अंक आठपानी असायचा पण आपण चारपानीच अंक काढायचा आणि त्यात जास्तीत जास्त फोटो टाकायचे असं ठरवलं.सवर् अाटिर्स्टला बोलावलं आणि सारा अंक हातानं लिहून काढला. अंक खरोखरच चांगला आणि वेगळेपणा जाणवेल असा झाला होता. राजीव हत्तयाची बातमीही सविस्तर दिली होती.मात्र गडबडीत एक घोटाळा झाला.तो दुसऱ्यादिवशी लक्षात आल्यावर आमच्या रात्रभरच्या मेहनतीवर पार बोळाच फिरला.संतोष महाजन तेव्हा संपादक होते.त्यांनी अग्रलेख लिहून दिला.अंग्रलेखात जे ध्यानी मनी नव्हतं ते घडलं असं एक वाक्य होतं.त्याएवेजी आर्टिस्ट कडून लिहिताना जे ध्यानी मनी होतं तेच घडलं असं चुकीचं लिहिलं गेलं. प्रुफरिडरनं तो अग्रलेख वाचला होता.मी देखील वाचला होता.पण आमचा दुहेरी गोंधळ झालेला असल्यानं चूक कोणाच्याच लक्षात आली नाही.अंकात ते तसंच छापून आलं .रोजच्या पेक्षा चारपट प्रिन्ट आॅड्रर होती.सवार्ंनी अंकाचं स्वागत केलं.राजीव गांधी गेल्यामुळं मुद्दाम हातांनी अंक देऊन लोकपत्रनं वेगळेपणा जपला असंही लोकांना वाटलं.दुपारपयर्त आम्ही सारे खूष होते.पण दुपारी दोन वाजता आमचे मुख्य संपादक कमलकिशोर कदम आॅफिसात आले.आणि त्यांनी चूक लक्षात आणून दिली.ते एवढे संतापले की,त्यांनी आमची चांगलीच हजामत केली.संपादकांपासून मला आणि आटिर्स्टलाही लेखी मेमो दिले. तेव्हा अजून संपादक व्यवहारवादी झालेले नव्हते.कातडीबचाव प्रवृत्तीचा प्रादुभार्वही अजून संपादकांना झालेला नव्हता.त्यामुळे चुकीची सारी जबाबदारी संतोष महाजन यांनी घेतली.काय शिक्षा करायची ती मला करा, असं त्यांनी सांगितलं.मुलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अंक काढलाय त्यामुळे झालेल्या चुकीबद्दल क्षमा करा अशीही विनंती केली पण कमलकिशोर कदम एवढे संतापले होते की,ते एकण्याच्या मनःस्थितीच नव्हते. झालेल्या प्रकऱणानं आम्ही चांगलेच दुखावलो.चूक अक्षम्य होती हे जरी खरं असलं तरी ज्या परिस्थितीत आम्ही अंक काढला होता त्याकडं दुलर्क्ष करून मुख्यसंपादक आम्हाला झापत होते.त्यामुळं सारा स्टाफच नाराज झाला आणिकाॅम्युटर सिस्टिम दुरूस्त होईपयर्त अंक काढायचा नाही असं आम्ही ठरवलं.नंतर काही दिवसांनी संतोष महाजन राजीनामा देऊन
लोकमतला निघून गेले.सहज एक आठवले म्हणून येथे शेअर केले.
एस.एम.देशमुख