केजरीवाल यांनी काल स्वतःला अटक करून घेण्याचा जो निर्णय घेतला आणि त्यानंतर तिहार समोर जो आपच्या मुठभर कार्यकर्त्यांनी जो तमाशा केला त्याची संभावना माध्यमांनी ड्रामा अशा शब्दात केली.त्याबद्दल केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.केजरीवाल ड्रामा करताहेत अशी बातमी तुम्ही कशी काय चालवू शकता असा प्रश्न त्यानी माध्यमांना विचारला आहे.
दरम्यान आज संजय सिंह आणि आशुतोष यांनी केजरीवाल यांची तिहारमध्ये केजरीवाल यांची भेट घेतली.केजरीवाल यांच्या सुटकेसाठी पार्टी वरच्या कोर्टात जाईल अशी चर्चा होती पण आशुतोष केजरीवाल यांची भेट घेऊन आल्यानंतर या चर्चेला पूर्ण विराम मिळाला.पार्टी वरच्या कोर्टात जाणार नसल्याचं स्पष्ट कऱण्यात आलं.केजरीवालल अटक प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे.
केजरीवाल यांनी तात्विकतेचा आव आणत जामिन घेण्यास नकार दिला असला तरी केजरीवाल यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना काल अटक झाली होती त्यांनी आज जामिन देऊन स्वतःची सुटका करून घेतली.