भाजप नेते नितीन गडकरी यांची बदनामी केल्याप्रकरणी ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्ली येथील पटियाला हाऊस न्यायालयाने २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांना या प्रकरणात १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यास कोर्टाने तयारी दर्शवली होती. परंतु केजरीवाल यांनी ही रक्कम भरण्यास नकार दिल्यामुळे त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली.विशेष म्हणजे केजरीवाल यांनी आधी रक्कम भरण्याची तयारी दर्शवली होती. परंतु नंतर अचानक जामिनाचे पैसे भरण्यास नकार दिला. २३ तारखेला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.