परिवतर्नासाठी मतदान
निवडणुकांचे कल लक्षात घेता देशात भाजप आघाडीचे सरकार येणार हे नक्की झालंय.काॅग्रेसचे अनेक दिग्गज नेते मागे पडले आहेत.या ट्रेन्डमध्ये नंतर फार फरक पडेल असं वाटत नाही.असं का झालं,काॅग्रेसची एवढी वाट का लागली याचं विश्लेषण होईल परंतू एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,हा निकाल केवळ मोंदीच्या प्रचाराचा भाग नाही.गेल्या दहा वषार्त देशातील जनता कंटाळली होती.जनता गरिबी,महागाई,बेकारी आणि अशाच बुनियादी प्रश्नांशी झगडत असताना देशातील सत्ताधारी भ्रष्टाचाराचे श्रीखंड आेरपत होती.त्यामुळं जनतेला बदल करायचा होता.काॅग्रेस अथवा राष्ट्रवादी जनतेला गृहित धरून चालली होती.आपण निवडणूक काळात जनतेला बरोबर मॅनेज करू शकतो हा मस्तवालपणा आता उतरतोय.निलेश राणे,पद्मसिंह पाटील यांच्या सारखे नेते पराभूत होण्याच्या छायेत आहेत.याचा अथर् जनता आता कोणाचीही दादागिरी मान्य करायला तयार नाही हाच होतो.जनतेनं परिवतर्नासाठी मतदान केलंय.हे लक्षात ठेऊनच जे आता सत्तेवर येणार आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.