अलिबाग शहरातील दांडेकर ऍटो पार्ट या दुकानाला मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दुकानाचे एक ते सव्वा कोटी रूपयांचे नुकसान झाले असावे असा प्राथमिक अंदाज आहे.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.मात्र अलिबाग नगर पालिका तसेच इतर कंपन्यांच्या चार अग्निशमन बंबाने तब्बल दोन तास झगडून आग आटोक्यात आणली.
दुकानाचे मालक अनिल दांडेकर दुकानाच्या वरच्या मजल्यावरच राहतात.दुकानाला आग लागल्यावर दांडेकर,त्यांच्या पत्नी आणि मुलगा टेरेसवर गेले पण आगीचे चटके वरही जाणवायला लागल्याने ते भयभित झाले.अखेर दत्त गोविंदा पथकाने त्यांची सोडवणूक केली.आग लागली त्याच्या बाजुलाच अन्य काही दुकाना असल्याने आग परसरण्याचा धोका होता.मात्र सुदैवानं आग आटोक्यात आणण्यात यश आले.नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी घटनास्थळास भेट दिली.