मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

0
1008

रायगड लोकसभा मतदार संघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून या कामासाठी 500 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यामध्ये 102 मतमोजणी पर्यवेक्षक ,102 मतोमोजणी सहाय्यक,102 मतमोजणी सुक्ष्म निरीक्षक,आणि 102 शिपायांचा समावेश आहे.त्यंाचे पहिले प्रशिक्षण देखील पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.अलिबाग येथे होणाऱ्या या मतमोजणीसाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
16 मे रोजी सकाळी 8 पासून मतमोजणी सुरू होईल.एका विधानसभा मतदार संघासाठी 14 असे सहा विधानसभा मतदार संघासाठी 84 टेबल ठेवण्यात आले आहेत.मतमोजणी केंद्राजवळ मिडिया सेलची व्ववस्था कऱण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here