जोरदार वारे,बदलते हवामान आणि आधुनिक ट्रॉलरकडून सुरू असलेल्या बसुमार मच्छिमारीमुळे मच्छिमारी व्यवसाय संकटात सापडला आहे,मासळीच्या अनेक प्रजाती नामशेष होत आहे हे टाळण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 मे ते 15 ऑगस्ट अशा 90 दिवसाचा करण्याच महत्वपूर्ण निर्णय मच्छिमार कृती समितीने घेतला आहे.या संदर्भात समितीच्या नुकत्याच रत्नागिरी येथे झालेल्या बैठकीस दमण,गोव्यापासून ते उत्तर मनेरीपर्यतच्या अनेक मच्छिमार संघटना उपस्थित होत्या. समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील अध्यक्षस्थानी होते.जून ते ऑगस्ट हा मासळीचा प्रजनन कालावधी असतो या काळात मासेमारी बंद राहिली तर मासळीचा दुष्काल संपेल असं कृती समितीचं म्हणणॅं होतं.मात्र करंजा मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांच्या अध्यक्षतेखाली काल ससून डॉक बंदरात झालेल्या बैठकीत कृती समितीच्या निर्णयास विरोध करून मासेमारी बंदीचा जो कालावधी सरकारने नक्की केला आहे त्या काळात म्ङणजे 10 जून ते 15 ऑगस्ट या काळातच मासेमारी बंद राहिल असे स्पष्ट कऱण्यात आले आहे.या बैठकीसही मुंबई.रायगड आणि परिसरातील अनेक सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.दोन संस्थांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकामुळे सर्व सामांन्य मच्छिमार संभ्रमात पडला आहे.