नागोठणे निजिक झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रूपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रूपयांची आर्थिक मदत मुख्यमंंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली .ते रोहा येथैे पत्रकारांशी बोलत होते..यापुर्वी रेल्वेने मृत आणि जखमींसाठी मदत जाहीर केलेली आहे.राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांनी आज ही मदत जाहीर केली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज रोहा,नागोठणे येथील रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळासही भेट दिली.त्यानंतर रोहा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले अपघातग्रस्तांवर शासकीय रूग्णालयात तसेच रेल्वे रूग्णालयात मोफत इलाज केले जात आहेत.अपघात नेमक कशामुळे झाला याची चौकशी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक चौकशी समिती नेमली आहे त्याचा अहवाला आल्यानंतर नेमके कारण समजू शकेल अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना स्थानिकांनी जी मदत केली आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना धन्यवाद दिले आहेत.संकटाच्या काळात एकत्र येऊन परस्परांना मदत करण्याची कोकणातील जनतेची परंपरा यावेळीही दिसून आली असे उद्दगार मुख्यमंत्र्यांनी काढले.त्याच्याबरोबर पालकमंत्री सुनील तटकरे होते.
दरम्यान दुपारी रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनीही रोह्याला भेट दिली.ते घटना स्थळावर गेले आणि रूग्णालयात जाऊन जखमींचीही त्यांनी विचारपूस केली.