दिवा- सावंतवाडी रेल्वेला काल झालेल्या अपघातातील मृतांची संख्या आता २२ वर पोहोचली असून जखमींची संख्या १६० वर गेली आहे.दरम्यान आज सकाळपासून रेल्वेची वाहतूक सुरू झाली असून सकाळी ५ वाजून २ मिनिटांनी पहिली गाडी नागोठणे येथून रवाना झाली.लांब पल्लयाच्या गाड्यांची वाहतूक सुरू होत आहे.
अपघाताचे गांभीयर् लक्षात घेऊन मु्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज सकाळी अकराच्या सुमारास घटनास्थळास भेट देत आहेत.त्यांच्यासमवेत रेल्वे मंत्री
मल्लिकाजुर्न खगेर् देखील असतील.पृथ्वीराज चव्हाण रूग्णालयात जाऊन रूग्णांचाही भेट घेतील.अपक्घाताचे कारण अजून समजू शकले नाही.