अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पत्रकारांना देशद्रोही ठरविल्यानंतर देशभरातील पत्रकारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.पत्रकारांना देशाचे शत्रू म्हणून हिणवणं बंद करा अशी तंबीच आज न्यूयार्क टाइम्सनं दिलीय.पत्रकारांना उद्देशून अशीच शेरेबाजी सुरू राहिली तर वातावरण भडकू शकतं असा इशारा द्यायला न्यूयार्क टाइम्स विसरलेला नाही.न्यूयॉर्क टाइम्सचे प्रकाशक ए.जी.सल्झबर्गर यांची आणि ट्रंप यांची गोपनीय भेट झाली.मात्र ट्रंप यांनी या भेटी संदर्भात ट्टिट केल्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सनं सविस्तर बातमी दिली.त्याच्या मिर्च्या ट्रंप यांना झोंबल्या.
न्यूयॉर्क टाइम्सचे प्रकाशक नेमके ट्रंप यांना का भेटले याबद्दल परस्पर विरोधी दावे केले जाताहेत.ट्रंप यांचा माध्यमांबद्दलचा पूर्वग्रह किती चिंताजनक आहे हे त्यांना भेटून सांगता यावं म्हणून आपण या चर्चेचं निमंत्रण स्वीकारलं असं सल्झबर्गर याचं म्हणणं आहे.सल्झबर्गर पुढं म्हणतात,ट्रंप माध्यमांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत.हे क्लेशदायकय.फेक न्यूज ही संज्ञा खोटी आणि धोकादायक आहे.फेक न्यूज पेक्षाही धोकादायक काय असेल तर पत्रकार लोकांचे शत्रू आहेत हा प्रचार कऱणं असं सल्झबर्गर यांनी म्हटलंय.ट्रंप यांच्या पत्रकारांबद्दलच्या प्रक्षोभक आणि भडकावू वक्तव्यामुळं पत्रकारांना धमक्या मिळण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळं हिंसेल चालना मिळेल असं सल्झबर्गऱ यांनी म्हटलंय.