मुंबईः मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारनं पत्रकार सन्मान योजनेसाठी 15 कोटी रूपयांची तरतूद केली असून या निधीतून पत्रकारांना पेन्शन दिली जाणार आहे.ज्या पत्रकाराचं वय 60 किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि ज्यांनी सलग 20 वर्षे पत्रकारिता केलेली असेल अशा पत्रकारांना दरमहा 10 हजार रूपये पेन्शन मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा ही रक्कम जास्त आहे.मराठी पत्रकार परिषदेने सतत दहा हजार रूपये पेन्शन द्यावी अशीच मागणी केलेली आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळानं वेळोवेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पेन्शनची मागणी केली होती.नागपूर येथे परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार पेन्शन योजना लगेच सुरू करणार असल्याचे जाहिर केले होते.त्यानुसार ही योजना सुरू झालेली आहे.मराठी पत्रकार परिषदेने या निर्णयाचे स्वागत केले आहे.