राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी टाइम्स ऑफ इंडियाचे प्रफुल्ल मारपकवार यांना आज दिलेल्या मुलाखतीत आपण युपीए-3 मध्ये कोणतंही पद स्वीकारणार नाहीत असं म्हटलंय.त्याचं हे वक्तव्य राज ठाकरेंसारखंच आहे.राज ठाकरे देखील सातत्यानं आपल्या भाषणातून सांगत असतात की,नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत सत्तेवर येणाऱ्या सरकारमध्ये आपला पक्ष कोणतंही मंत्रीपद स्वीकारणार नाही. दोन्ही नेत्यांच्या या वक्तव्यांमधून आपणास सत्तेची लालसा नाही हे दाखविण्याचा प्रयत्न असला तरी वास्तव हे आहे की ,दोघांसाठीही द्राक्ष आंबट आहेत . म्हणजे युपीए-3 आता सत्तेवर येणार नाही हे स्वतः शरद पवार यांनाही माहिती आहे, त्यामुळं मंत्रीपद मिळण्याचाही प्रश्न नाही.तेव्हा पद स्वीकारणार नाही असं म्हणायला जातंय काय? राज ठाकरेंची अवस्था अशीच आहे.त्यांच्या पक्षाचा एकही खासदार निवडून येण्याची शक्यता नाही असा राजकीय निरीक्षकांचा दावा आहे.अशा स्थितीतही एखादं,दुसरा खासदार निवडून आलाच तर त्याला कोणी मंत्रीपद देणार नाही.तसा प्रयत्न नरेंद्र मोंदींनी केलाच तर शिवसेना ते होऊ देणार नाही.राज ठाकरे यांना ही वस्तुस्थिती माहित असल्यानंच ते वारंवार सागत आहेत की,केंद्रात आम्ही मंत्रीपद स्वीकारणार नाहीत.तत्वाच्या गोष्टी लोकांना दाखविण्यासाठी.खरी अडचण वेगळी आहे हे कसं सांगणार ?