सोनिया गांधी आणि शरद पवार यांची एक संयुक्त सभा काल मुंबईत होणार होती.सोनिया गांधींची तब्येत बिघडल्यानं त्या एेनवेळी सभेला आल्या नाहीत.त्यांच्या एेवजी राहूल गांधी सभेला आले.सोनिया गांधी येणार नाहीत म्हटल्यावर शरद पवार यांनी देखील सभेकडं पाठ फिरविली.सभेला अनुपस्थित राहून आपण राहूल गांधी यांचं नेतृत्व मानायला तयार नाहीत हा संदेश त्यांना द्यायचा होता.तो दिला गेला.मात्र यातून आघाडी धमार्शी द्रोह झाला त्याचं काय ?.या घटनेकडं मी वेगळ्या अंगानं बघतो.तिकडं सिंधुदुगर्मध्ये राष्ट्रवादीचे दीपक केसरकर यांनाही नारायण राणे यांचे नेतृर्त्व मानायला नकार दिला.ते देखील त्यांच्या सभांना प्रचाराला गेले नाहीत.दीपक केसरकरांची ही कृती चुकीची,आघाडी धमर् न पाळणारी होती म्हणून त्यांना नोटिस पाठविली गेली.बाळ भिसे यांना जिल्हाध्यक्षपदावरून बाजुला केले गेले.दीपक केसरकर यांच्यावर शरद पवार यांनी टीकाही केली.राहूल गांधी याचं नेतृत्व मान्य नसल्यानं पवार जर राहूल गांधीच्या व्यासपीठावर जायला तयार नसतील,आघाडी धमर्ेचीही ते पालन करणार नसतील तर आघाडीधमर् दीपक केसरकर यांनी पाळला पाहिजे असा आग्रह धरणे कोणत्या धोरणात बसते.? शरद पवार यांना एक न्याय आणि दीपक केसरकरांना दुसरा न्याय हा राष्ट्रवादीचा दुहेरी मापदंड झाला.कायर्कत्यार्ंनी शिस्त पाळली पाहिजे,नेते कसेही वागले तरी चालते हेच या प्रकरणातून दिसते.राष्ट्रवादीचे प्रवक्ते यावर स्वाभाविकपणे गप्प आहेत.