- बीड येथील पुण्यनगरीचे ब्युरो चीफ भास्कर चोपडे यांचे थोडयावेळापुर्वी दुःखद निधन झाले.भास्कर चोपडे यांना आराम पडावा,ते दुर्धर आजारातून बरे व्हावेत अशा सदिच्छा राज्यभरातून व्यक्त झाल्या होत्या.आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यावरील उपचार थांबू नयेत यासाठी राज्यभरातून पत्रकार आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींनी मोठी आर्थिक मदतही केली.मात्र एवढे सारे प्रयत्न करूनही आपण भास्कर चोपडे यांना वाचवू शकलो नाहीत.ते आपल्याला सोडून गेले.त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.दोन्ही मुले औरंगाबादेत शिक्षण घेत आहेत.कोणतेही व्यसन नसलेला,सर्वांशी प्रेमानं वागणारं,अबोल,शांत स्वभावाचा पत्रकार आपणास सोडून गेला आहे.मराठी पत्रकार परिषदेचे त्याच्या निधनाने मोठेच नुकसान झाले आहे.कारण बीडमध्ये संघटनेची नव्यानं बांधणी करून ही संघटना अधिक पत्रकाराभिमूख करण्यात अनिल महाजन,सुभाष चौरे ,अनिल वाघमारे यांच्याबरोबरीनं भास्कर चोपडेचेही योगदान होते.ते जिल्हा शाखेचे सरचिटणीस होते.त्यामुळं त्यांच्या निधनाने परिषदेची मोठी हानी झाली आहे.त्यांच्या आत्म्यास सत्तगती मिळो हीच प्रार्थना.–
- भास्कर चोपडे यांच्या् निधनाबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांच्या निधनाने मराठी पत्रकार परिषदेचा एक खंदा कार्यकर्ता गमविला असल्याची भावना व्यक्त केली आहे.