सरकारी कामे करण्यासाठी लाच घेण्याबाबत आणि पत्रकारांच्या सुरक्षितेतेबाबत भारत आशिया खंडातील सर्वात खराब देश असल्याचे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. भ्रष्टाचाराच्या बाबत भारताची प्रतिमा अद्याप खराबच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 2017च्या यादीत भारताचा क्रमांक  81वा आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराबाबत या अहवालात 180 देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2016मध्ये भारताचा 79वा क्रमांक होत

भ्रष्टाचाराविरोधात सर्व देशांना कडक संदेश देण्याच्या उद्देशाने 1995मध्ये हा निर्देशांक सुरु करण्यात आला होता. एखाद्या देशात किती भ्रष्टाचार होतो हे विश्लेषण, व्यापारी, तज्ञ आणि अनुभवाच्या आधारावर निश्चित केले जाते.

या यादीतील देशांना ० ते १०० दरम्यान गुण दिले जातात. ज्या देशांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आहे त्यांना ० तर जिथे स्वच्छ कारभार होतो त्यांना १०० गुण दिले जातात. गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील भारताला ४० गुण देण्यात आले आहेत. २०१५ मध्ये भारताला  सर्वात कमी ३८ गुणे देण्यात आले होते. त्यानंतर यात कोणताही बदल झालेला नाही.

पत्रकारांसाठी सुरक्षित नाही भारत

आशिया खंडातील काही देशांमध्ये पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विरोधीपक्ष नेते, न्यायव्यवस्थेशी संबंधित व्यक्तींना धमक्या दिल्या जातात. त्यांची हत्याही केली जाते, असेही ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने म्हटले आहे.

प्रशांत महासागर क्षेत्रातील  भ्रष्टाचार आणि पत्रकारांवर हल्ले होण्याचे सर्वाधिक प्रमाण फिलीपाईन्स, भारत आणि मालदीव या देशांमध्ये आहे. या देशांमध्ये पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी नेते आणि समाजातील चुकीच्या गोष्टी समोर आणणाऱ्या धमकावले जाते. अनेकवेळा त्यांची हत्या देखील केली जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here