रायगड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा बदलीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने बनावट द्स्तऐवज तयार केले प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने जिल्हयात खळबळ उडाली आहे.या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे यांनी आज केली आहे.
बनावट कागदपत्रे तयार करून आणि त्यावर तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या बनावट स्वाक्षर्या करून 21 शिक्षकांच्या बदल्या झाल्याचे दाखविण्यात आले होते.हे प्रकरण उजेडात आल्यानंतर त्याची खाते निहाय चौकशी केली गेली त्यानुसार 20 प्राथमिक शिक्षक आणि 1 उपशिक्षिकेची बदली बोगस कागदपत्रे तयार करून झाल्याचे दाखविल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी आज अलिबाग पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यानुसार भादवि 420,465,471,कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात मोठे रॅकेट असावे असा संशय व्यक्त केला जात आहे..