इलेक्टॉनिक मिडिया विकला गेलेला आहे,त्यावर सारखा मोदी नामाचाच जप सुरूय असे आरोप करून मिडिय़ालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभॅं कऱण्याचं काम अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी सातत्यानं करीत असतात. मात्र त्यांच्या या आरोपात काहीही तथ्य नाही हे आता एका पाहणीतून समोर आलेलं असल्यानं त्यांची खरं तर बोलती बंद व्हायला हवी .पण तसं होणार नाही.ज्या संस्थेनं सर्व्हे केलाय ती संस्थाच मोदीची एजन्ट आहे किंवा तो सर्व्हेच पक्षपाती आहे असा आरोप केजरीवाल करू शकतात.कारण जगात आपल्याशिवाय कोणीही प्रामॉंणिक नाही असे त्यांना सातत्यानं वाटतं असतं.
टी.व्हीवरच्या प्राईम टाइम बुलेटीनवर मोदी किंवा राहूल गांधी यांच्यापेक्षा जास्त स्पेस ़अरविंद केजरीवाल यांनाच मिळाल्याचं पाहणी केलेल्या संस्थेचा दाावा आङे.
आज तक,एबीपी न्यूज, झी न्यूज ,एनडीटीव्ही आणि सीएनएन-आयबीएन या वाहिन्यांवर राश्री 8 ते 10 या प्राईम टाइमच्या बातम्यात केजरीवाल यांना सर्वाधिक म्हणजे तब्बल 429 मिनिटांचा वेळ मिळाला आहे.नेरंद्र मोदी त्यांच्या तुलनेत बरेच मागे असून त्यांना 365 मिनिटं मिळाली आहेत.राहूल गांधींना केवळ 72 मिनिटाचीच स्पेस मिळाली आहे.वस्तुतः अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या जागा किती येतील हे ते देखील सांगू शकत नाहीत.अशा स्थितीतही देशात सरकार बनविण्यास निघालेल्या एका पक्षाच्या नेत्यापेक्षा ज्याच्या पाच जागाही येण्याची शक्यता नाही अशा पक्षाच्या नेत्याला जास्त कव्हरेज मिळाले असतानाही मिडिया विकला गेल्याचे आरोप कोणी करीत असेल तर त्यांना मिडियाची काविळ झालीय असंच म्हणावं लागेल.
प्रादेशिक नेत्यांमध्ये आरजेडी नेते लालू प्रसाद यांना 3 टक्के ,आणि नतिीशकुमार,राज ठाकरे,मुलायमसिंग,अखिलेश ,ममता बॅनर्जी यांना दीड ते दोन टक्का एवढाच वेळ मिळालेला आहे.1 ते 14 एप्रिल या काळातला हा सर्व्हे आहे.
सतत टीव्हीच्या पडद्यावर दिसण्याची चटक लागलेल्या केजरीवाल यांना एक दिवस जरी टीव्हीचं कव्हरेज मिळालं नाही तरी ते अस्वस्थ होतात आणि मिडिया विकला गेल्याचा आरोप करतात.मात्र त्यांच्या आरोपात तथ्य नसून सर्वाधिक कव्हरेज त्यांनाच दिले गेल्याचं समोर आलं आहे. मिडियाला पैसे देऊन कव्हरेज मिळविता येतं असा जर आपच्या नेत्यांचा दावा असेल तर प्राईम टाइममध्ये सर्वाधिक कव्हरेज मिळविण्यासाठी केजरीवाल यांनी मिडियाल किती पैसे मोजले याचा हिशोब त्यांनी आता दिला पाहिजे.
टाइम्स ऑफ इंडियानं आजच्या ंंअंकात पहिल्या पानावर याबाबतची सविस्तर बातमी प्रशिध्द केली आहे.