रायगडात दोन हजारांवर वनराई बंधार

0
1449

रायगडात दोन हजारांवर वनराई बंधार

‘पाणी अडवा,पाणी जिरवा’चा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन रायगड जिल्हयात यंदा लोकसहभागातून तब्बल 2 हजार 804 वनराई बंधारे बांधण्यात आल्याने पाणी टंचाईचे संकट काही काळ तरी लांबणीवर पडणार आहे. 42 हजार 70 जणांचे हात  हे वनराई बंधारे तयार करण्यासाठी लागले आहेत.त्यामुळं सरकारचे 15 कोटी 42 लाख 5 हजार रूपयांची बचत झाली आहे.वनराई बंधार्‍यांमुळं जिल्हयात 126.18 घनमीटर पाण्याचा जलसाठा साठला आहे.या वनराई बंधार्‍यांमुळं जलसाठ्यात तर वाढ झाली आहेच त्याचबरोबर रब्बी हंगामातील भाजीपाला,तृणधान्य पिकांना देखील पाणी मिळणार आहे.शिवाय वीटभट्टी मस्त्यबीज सारख्या कुटिरोद्योगांना मुबलक पाणी मिळणार आहे. घरगुती वापरासाठी आणि पशू-पक्ष्यांसाठीही हा जलसाठा उपयुक्त ठरणार असल्याने जिल्हयात या योजनेचे स्वागत होत आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभय यावलकर यांच्या संकल्पनेतून आणि पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश सोळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधार्‍यांची ही चळवळ जिल्हयात यशस्वी झाली आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here