मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे वर खालापूरनजिक झालेल्या भीषण अपघातात तीनजण ठार झाले असून अन्य सातजण जखमी झाले आहेत.जखमींना तातडीने कळंबोलीच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
खालापूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मुंबईहून पुण्याकडं जाणार्या एनोव्हा गाडीचा मागचा टायर फुटला आणि गाडीचा वेग आवरण्याच्या प्रयत्नात ही गाडी समोरच्या लेनमधून जाणार्या रिटझ् गाडीवर जाऊन आदळली.दोन्ही गाडया भरधाव वेगात एकमेकांवर आदळल्याने त्यातील एक गाडी उलटली आणि तीनजण जागीच ठार झाले.आज दुपारी अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती ती आता पूर्ववत झाली आहे.–
(Visited 115 time, 1 visit today)