तरूण तेजपालचं काय होणार ?

0
1141
Tarun Tejpal outside at Goa high court on Tuesday. Express Photo by Pradip Das. 18.02.2014. Mumbai.

तेहलकाचे माजी संपादक तरूण तेजपाल यांच्यावरील बलात्काराच्या आऱोपाचा खटला कुठपर्यंत आलाय ? काही माहिती आहे.पणजीहून आलेली ही बातमी वाचा..–

पणजी: पत्रकार युवतीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपपत्र रद्द करण्याच्या आरोपी तरूण तेजपाल याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली असून खंडपीठाने निवाडा राखून ठेवला आहे. 
युवतीवरील बलात्कार प्रकरणात आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप हे साफ खोटे असून ते रद्द करण्यात यावेत अशी याचिका तेजपाल याने खंडपीठात केली होती. म्हाप्सा विशेष न्यायालयात त्याच्या विरुद्ध आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर तेजपालने त्यांना खंडपीठात आव्हान दिले होते. तेजपालचे वकील अमर लेखी यांनी जुनेच युक्तिवाद करताना आरोप निराधार असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास करणा:या क्राईम ब्रँचकडून सीसीटीव्ही फुटेज देण्यात आलेली नाही. तसेच इतर माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले. तेजपाल त्या युवतीवर आगळीक करीत असल्याचे कुठेच कँम:यातही टीपले गेलेले नाही. त्यामुळे हे आरोप रद्दबातल ठरवावेत अशी मागणी त्यांनी केली. 
क्राईम ब्रँचचे वकील सरेश लोटलीकर यांनी तेजपालची ही याचिका म्हणजे वेळकाढू धोरण असल्याचे सांगितले. क्राईम ब्रँचकडून या प्रकरणात तेजपालविरुद्ध सर्व पुरावे मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात साक्षिदार, पीडीत मुलीची जबानी, तेजपालचे इमेल या सर्वाचा उल्लेख केला. उभय बाजू ऐकून  घेतल्यानंतर न्यायमूर्ती नूतन सरदेसी यांनी या प्रकरणात निवाडा राखून ठेवल्याचे जाहीर केले. दरम्यान तेजपाल प्रकरणात म्हापसा न्यायालयात 9 जानेवारीपासून खटला सुरू होणार होता. खंडपीठाच्या निवाडय़ावर या खटल्याचे भवितव्य अवलंबून आहे.

लोकमतवरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here