आपली ‘परिषद’ 78 वर्षांची झाली.. 

0
2188

देशातील मराठी पत्रकारांची पहिली संघटना असलेल्या आणि त्या अर्थानं पत्रकारांची मातृसंस्था म्हणून उल्लेख होणार्‍या मराठी पत्रकार परिषदेचा उद्या 3 डिसेंबर रोजी स्थापना दिवस आहे.उद्या परिषद 78 वर्षे पूर्ण करून 79 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.असंख्य चढउतार पाहिलेल्या परिषदेचे नेतृत्व आभाळा एवढी उंची लाभलेल्या अनेक दिग्गज पत्रकारांनी केलेले आहे.राज्यातील असंख्य पत्रकार तीन तीन पिढ्यापासून परिषदेशी जोडल्या गेलेल्या आहेत हे परिषदेचं वैभव आहे.परिषद उद्या आपला वर्धापन दिन साजरा करीत असताना राज्यातील तरूण पत्रकारांना परिषदेचा इतिहास माहिती असणं आवश्यक आहे.त्यादृष्टीनं परिषदेची स्थापन कधी झाली,परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कोण होते,परिषदेचं पहिलं अधिवेशन कुठं झालं.परिषदेनं पत्रकारांच्या हिताचे कोणते उपक्रम राबविले,परिषदेचे आजपर्यंतचे अध्यक्ष कोण होते,ही सारी माहिती नव्या पिढीतल्या पत्रकारांनी समजून घेणे आवश्यक आहे.

————————————–

राठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची सर्वात जुनी,सर्वात मोठी आणि सर्वसमावेशक अशी एकमेव संघटना आहे.राज्यातील 35 जिल्हे आणि जवळपास 340 तालुक्यात परिषदेच्या शाखा विस्तार झालेला आहे..एवढंच नव्हे तर दिल्ली,पणजी,हैदराबाद,विजापूर अशा अन्य काही राज्यातील शहरातही परिषदेच्या शाखा कार्यरत आहेत.देशभरातील 8 हजारांवर मराठी पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले आहेत. 3 डिसेंबर 1939 रोजी स्थापन झालेल्या परिषदेचा इतिहास रोमहर्षक आणि पत्रकारांच्या नव्या पिढीसाठी प्ररेणादायक आहे.पत्रकारितेत ज्यांनी उल्लेखनिय कार्य केलेलं आहे असे अनेक मान्यवर आणि नामंवत पत्रकार मराठी पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले होते.परिषदेच्या स्थापनेतही त्यांचा सिंहाचा वाटा होता.मराठी पत्रकार परिषदेच्या प्रत्येक सदस्यांसाठी ही बाब  अभिमानास्पद आहे.

महाराष्ट्रात मराठी पत्रकारांची आर्थिक,बौध्दिक आणि वैचारिक उन्नती व्हावी यासाठी एखादी संघटना असावी असा एक विचार स्वातंत्र्याच्या बराच अगोदर तत्कालिन पत्रकारांच्या समोर आला.त्याला मूर्त स्वरूप देता यावं यासाठी 1933 मध्ये पुण्यात संपादकांचं एक संमेलन भरविण्यात आलं  होतं .त्यासाठी गोपाळराव ओंगले यांनी पुढाकार घेतला होता.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देखील तेच होते.संमलनाचा त्यावेळी मोठा गाजावाजा झाला .मौजनं तर खास विशेषांकही काढला होता. तात्यासाहेब केळकर यांच्यासारख्या ज्येष्ठांचा संमेलनात सहभाग होता.तथापि ज्या उद्देशानं हे संमेलन भरविण्यात आलं होतं तो उद्दश काही सफल झाला नाही.पत्रकार संघटना स्थापनेच्यादृष्टीनं काहीही नि र्णय होऊ शकला नाही.याची अनेक कारणं आहेत.त्यापैकी एक म्हणजे,ओंगले यांच्या भाषणात संयुक्त महाराष्ट्राच्या कल्पनेचं बिजारोपण केलेलं होतं.मुख्य मुद्दा सोडून उपस्थित झालेला हा विषय अनेकांना आवडला नाही.त्यामुळं मंडळी जमली,वेगवेगळ्या विषयावर चर्चा  क रून निघून गेली.त्याकाळी मुंबईत पत्रकारांची अशी मासिक संमेलनं भरत.पुण्यातल्या या संमेलनाला मुंबईतील पत्रकारांच्या मासिक संमेलनासारखंच स्वरूप आलं होतं.त्यामुळं या संमेलनाची जेवढी च र्चा झाली तेवढ्याच चर्चेनंतर हा विषय लोकांच्या विस्मृतीतही गेला.नंतरची पाच-सहा वर्षे मग काहीच झालं नाही. ती वर्षे अशीच गेली.मात्र नंतरच्या काळात वृत्तपत्र व्यवसाय आर्थिक संकटामुळं कमालीचा अडचणीत आला होता.कमालीचं अस्थैर्य आलं.त्यामुळं पत्रकाराना मानसन्मानानं जगणं,आर्थिक स्वास्थ्यानं जगणं केवळ कठिणच झालं असं नाही तर ते दुरापास्तही झालं.दुसरीकडं अभ्यासू,हाडाच्या पत्रकारांचीही उणिव भासायला लागली.निस्पृह भावनेनं पत्रकारितेला वाहून घेणारे पत्रकार दुर्मिळ झाले होते.(  म्हणजे पत्रकारितेत निस्पृहपणे,एक सेवा किंवा व्रत समजून काम करणाऱ्या पत्रकारांची टंचाई केवळ आजच भासते आहे असं नाही तर 75 वर्षांपूर्वी देखील हीच परिस्थिती होती,ध्येयवादी मंडळींची पत्रकारितेला तेव्हाही गरज होती .आजही आहे.) पत्रकारिततील ही मरगळ दूर करून वृत्तपत्र व्यवसायाला नवी उभारी यावी यासाठी सघंटनात्मक स्वरूपाचे सामुहिक प्रयत्न करण्याची गरज पुन्हा एकदा सर्वांनाच जाणवायला लागली.त्यादृष्टीनं प्रयत्नांनीही मग वेग घेतला.1939च्या सप्टेबरमध्ये भा.वि.वरेरकर,लालजी पेंडसे,अनंत काणेकर,गो.बा.महाशब्दे यांच्यासारखे काही मान्यवर मराठी पुरोगामी लेखक संघाच्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र आले होते.बैठकीत यासर्वांनी लेखक संघाप्रमाणं संपादक,उपसंपादकांचे एक संमेलन बोलावून ठोस अशी काही तरी योजना अंमलात आणावी असा ऩिर्णय घेतला.ही सारी मंडळी मग केवळ च र्चा करूनच थांबली नाही तर संपादक,उपसंपादक आणि बातमीदारांची एक बैठक 25 ऑक्टोबर 1939 रोजी मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये बोलावण्यात आली.भा.वि.वरेरकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.या बैठकीस 19 नियतकालिकांचे संपादक,उपसंपादक उपस्थित होते.बैठकीत पत्रकारिते समोरील विविध प्रश्नांवर सांगोपांग च र्चा झाली.पत्रकारांच्या स्थितीवरही अनेकांनी मतं व्यक्त केली.ही सारी परिस्थिती बदलायची असेल तर सामुहिक प्रयत्नांची गरज आहे आणि त्यासाठी एखादं प्रभावी व्यासपीठ असलं पाहिजे यावर उपस्थितांचं एकमत झालं.  पत्रकारांची ही संघटना महाराष्ट्रव्यापी असावी असंही बैठकीत ठरलं.म राठी पत्रकार परिषदेची मुहूर्तमेढ इथंच रोवली गेली.संघटना स्थापन करतान पत्रकारंंाचं महाराष्ट्र पातळीवरचं एक अधिवेशन किंवा परिषद भरविली जावी अशी सूचना के.रा.पुरोहित यांनी मांडली.ती स्वीकारण्यात आली.संघटना स्थापन करण्याचं ठरलं पण संघटनेचं नाव काय असावं यावर बैठकीत तब्बल दोन तास काथ्याकूट झाला.अंतिमतः अनंत काणेकर यांनी संस्थेचं नाव मराठी पत्रकार परिषद असावं असं सूचवलं.त्यावर साऱ्यांची मतं आजमाविली गेली.साऱ्यांनाच हे नाव मान्य होतं.आता वेळ घालविण्याची कोणाचीच तयारी नव्हती,3 डिसेंबर 1939 रोजी मुंबईतील विल्सन हायस्कूलच्या प्रांगणात मुंबई मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आलं होतं.तत्कालिन पत्रकारांमध्ये अनेकजण ज्येष्ठ साहित्यिकही असल्यानं साहित्य संमेलनातच मराठी पत्रकार परिषद स्थापन करण्याचा ठराव मांडला गेला.तो संमतही झाला.ठराव संमत झाल्यानंतर परिषदेच्या पहिल्या कार्यकारिणीची निवडही याच संमेलनात गुप्त मतदान पध्दतीनं केली गेली.बारा उमेदवार रिंगणात होते.त्यापैकीवा.रा.ढवळे,र.धो.कर्वे,के.रा.पुरोहित,आप्पा पेंडसे,य.कृ.खाडीलकर,वरेरकर,का.म.ताम्हणकर,यांची कार्यकारिणीवर निवड केली गेली.कार्यकारी मंडळ अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत सुंदर मानकर,द.पु.भागवत,आणि पालेकर यांना स्वीकृत सद्‌स्य म्हणून कार्यकारी मंडळावर घेण्यात आलं.परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून कार्यकारी मंडळानं ज्ञानप्रकाशचे संपादक काकासाहेब लिमये यांची एकमतानं निवड केली .तेच परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. कार्यध्यक्ष म्हणून भा.वि.वरेरकर यांची निवड केली गेली.अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष नवाकाळचे संपादक य.कृ.खाडीलकर झाले.के.रा.पुरोहित हे मराठी पत्रकार परिषदेचे पहिले सरचिटणीस झाले.याच वेळी संघटनेचं काम वाढविण्यासाठी मुंबईत आणि पुण्यात परिषदेच्या शाखा स्थापन कऱण्याचा आणि पुरोहितांनी पुण्यात आणि पेंडसे यांनी मुंबईत परिषदेला अधिकाधिक पत्रकारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करावा असे ठरले.तशी जबाबदारी त्या दोघांवर सोपविली गेली.मुंबईसाठी मुंबई मराठी परिषद  स्थापन करावी असा ठराव पुरोहितांनी मांडला.या ठरावास सह्यार्दीचे काळे आणि मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आचार्य अत्रे यांनी पाठिंबा दिला हा ठराव संमत केला गेला.  परिषदेच्या या अधिवेशनास 69 नियतकालिकांचे प्रतिनिधी मिळून 110 पत्रकार उपस्थित होते.यावेळी इ तरही काही ठराव संमत झाले.अशा प्रकारे 3 डिसेंबर 1939 रोजी मराठी पत्रकार परिषदेची अधिकृतरित्या स्थापना झाली.-

काकसाहेब लिमये यांनी 1939 पासून पुढील अधिवेशनापर्यत एका कार्यकारी मंडळाची निवड केली.पत्रकार परिषदेच्या या मध्यवर्ती मंडळात अध्यक्ष कृ.ग.लिमये,उपाध्यक्ष शं.बा.किर्लोस्कर व त्र्यं.र.देवगिरीकर यांच्यासह ए कूण सोळा सभासद होते.पुरोहित आणि रा.गो.कानडे हे सरचिटणीस होते.मुंबई शाखेचे पहिले अध्यक्ष म्हणून अनंत काणेकर यांची निवड केली गेली होती.चिटणीस द.पु.भागवत होते.अन्य नऊ सभासद होते.दा.वि.गोखले हे पुणे शाखेचे पहिले अध्यक्ष होते.दि.वा.दिवेकर चिटणीस होते.तसेच अन्य दहा सदस्य कार्यकारिणीत होते.मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली.पुणे आणि मुंबईतील शाखांचं काम जोरात सुरू झालं.राज्यातील पत्रकारही परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र आले.परिषदेच्या निमित्तानं मराठी पत्रकार प्रथमच एकत्र आले होते.पत्रकार संघटित झाल्यामुळं सरकारच्या प्रांतिक वृत्तपत्र सल्लागार समितीवर परिषदेचा एक प्रतिनिधी घ्यावा लागला.य.कृ.खाडीलकर यांची पहिले प्रतिनिधी म्हणून समितीवर नेमणूक केली गेली.परिषदेच्या काही बैठका पुण्यात तर काही मुंबईत घेतल्या गेल्या.त्यात पत्र सल्लागार समितीवर मराठीचा आणखी एक प्रतिनिधी असला पाहिजे अशी मागणी कऱण्यात आली.ती मान्य केली गेली.समितीवर कोणाला पाठवायचे यासाठी निवडणूक घेतली गेली.त्यात काकासाहेब लिमये यांना पुण्यातर्फे पाठविण्याचं ठरलं.

 दुसरं अधिवेशन पुण्यात

दोन वर्षांनी परिषदेचं दुसरं अधिवेशन 18 मे 1941 रोजी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात घेण्यात आलं. पहिल्या अधिवेशनाप्रमाणंच अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली.त्यात अध्यक्ष म्हणून न.र.फाटक यांची निवड झाली..केसरीचे संपादक तात्यासाहेब करंदीकर हे स्वागताध्यक्ष होते.पुण्याच्या अधिवेशनात अनेक ठराव झाले .पहिल्या आणि दुसऱ्या अधिवेशनाच्या काळात अनेक घडामोडी घडल्या होत्या.रत्नागिरी इ थं भरलेल्या साहित्य समेंलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना ना.सी.फडके यांनी पत्रव्यवसायावर आणि संपादक,उपसंपादकांवर सपाटून टिका केली होती.या संमेलनास पत्रकार परिषदेचे सरचिटणीस पुरोहित तसेच पेडसे उपस्थित होते.अध्यक्षांनी वृत्रपत्रसृष्टीवर केलेली टीका या दोघांना मान्य होणं शक्य नव्हतं.या दोघांनी तसेच संमेलनास उपस्थित असलेल्या अन्य पत्रकारांनी फडके यांच्याकडे जाहीर चर्चेची मागणी केली.मात्र अध्यक्षांनी ती धुडकावून लावल्यानं विषय नियामक सभेत अध्यक्षांच्या विरोधात निंदाव्यंजक ठराव मांडण्यात आला.तो ठराव संमत झाला नाही हे जरी खरं असलं तरी साहित्य संमेलनाच्या इतिवृत्तांत त्याची नोद घ्यावी लागली.एवढं सारं रामायण घडल्यानंतर समारोपाच्या कार्यक्रमात फडके काहिशे नरमले आणि आपली तक्रार सर्वच पत्रकारांबद्दल नसून काहींबद्दल आहे अशी आजच्या पुढाऱ्याला शोभेल अशी टिप्पणी केली.काही म्हणजे नेमक्या कोणत्या यावर मात्र ते काही बोलले नाहीत किंवा कोणत्या वर्तमानपत्राचं नावही ते घेऊ शकले नाहीत.या घटनेचे पडसाद मराठी पत्रकार परिषदेच्या पुण्यातील अधिवेशनात उमटणे स्वाभाविक होते.त्यावर जोरदार च र्चा झाली.  पुरोहित आणि पेंडसे यांनी फडके याच्या वक्तव्याला रत्नागिरीत जोरदार आक्षेप घेऊन कारण नसताना कोणी पत्रकारांना डिवचले तर आम्ही ते खपवून घेणार नाही.त्याला तीव्र प्रतिकार करू आणि प्रसंगी जश्यास तसे उत्तर देऊ हे दाखवून दिलं.परिषदेचा हा लढाऊबाणा पुढच्या काळातही कायम राहिला.पत्रकारांचे हक्क आणि पत्रकारांच्या स्वाभिमानाच्या लढ्यात परिषद नेहमीच आक्रमक राहिली हे आपणास दिसेल. बि हार प्रेस बिलाचा विषय असो की नंतर राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याचा विषय असो परिषद  नेहमीच आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उ तरलेली दिसेल. विशेषतः एस.एम.देशमुख 2002मध्ये अध्यक्ष झाल्यानंतर परिषद अधिकच आक्रमक झाली.पत्रकारांवरील हल्ले आणि पत्रकाराच्या स्वाभिमानाचे अनेक लढे त्यांनी रस्त्यावर येत उभे केले.

 तिसरं अघिवेशन कोल्हापूरला

मराठी पत्रकार परिषदेचं तिसरं अधिवेशन 30 मे 1942 रोजी मुंबईतील गिरगावातील ब्राह्मण सभेच्या जागेत भरलं.त्याचे उद्घघाटन केले मुंबईचे महापोर मेहरअल्ली यांनी.यावेळेस अधिवेशनाचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला होता,ज.स.करंदीकर यांना.स्वागताध्यक्ष होते मुंबईच्या प्रभातचे श्री.शं.नवरे.परिषदेचे चौथे अधिवेशन कोल्हापूरला घ्यावं असं निमंत्रण मुंबईच्या अधिवेशनात सत्यवादीचे बाळासाहेब पाटील यांनी दिलं.हे निमंत्रण स्वीकारण्यात आलं.त्यानुसार 1 फेबु्रवारी 1944 रोजी  य.कृ.खाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडलं.स्वागताध्यक्ष होते विभाविलासकार गोखले तर कार्याध्यक्ष होत ेबाळासाहेब पाटील.कोल्हापूरच्या अधिवेशनाचा कालखंड हा राजकीयदृष्ट्या कमालीचा संवेदनशील होता.चले जाव चळवळ देशभर सुरू होती,देशभर आंदोलनाची तीव्रता वाढत असल्यानं वृत्तपंत्रं,सभा,संमेलनांवर अनेक ठिकाणी निर्बंध आलेली होती.अशा अशांत राजकीय वातावरणात पार पडलेल्या कोल्हापूर अधिवेशनाचं उद्धघाटन विजयमाला राणीसाहेब यानी केलं होतं.

मराठी परिषदेची स्थापना तर झाल ी होती.पण परिषदेचा कारभार नेमका कसा असावा यासंबंधीची रितसर घटना मात्र अजून तयार झाली नव्हती.पहिली तीन अधिवेशनं अशीच घटनेशिवाय झाली.नंतरच्या काळात परिषदेची व्याप्ती वाढत होती.मात्र घटना नसल्यानं अनेक अडचणी येत होत्या.अशा स्थितीत तिसऱ्या अधिवेशऩातच एक घटना समिती स्थापन कऱण्याचा नि र्णय घेण्यात आला होता.त्यानुसार घटना समिती स्थापन केली गेली.समितीनं परिषदेची घटना तयार करून ती कोल्हापूरच्या अधिवेशनात मांडली.दा.वि.गोखले.श्री.शं.नवरे आणि काकासाहेब लिमये यांच्या पाठिंब्यानं परिषदेची घटना मान्य केली गेली.खाडिलकरांच्या अध्यक्षपदाच्या काळात परिषेदेला घटना तर मिळालीच पण त्यांच्या एक वर्षाच्या काळात राज्यातील सोळा पत्रकार संघ परिषदेशी जोडले गेले.याच काळात राज्यातील अनेक जिल्हयात मराठी पत्रकार संघ स्थापन झाले होते.ते परिषदेच्या झेंड्याखाली येऊन परिषदेची व्याप्ती क्रमशः  वाढत चालली होती.अशा उत्साही वातावरणातच परिषदेचे पाचवे अधिवेशन दा.वि.गोखले यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर इ थं झालं होतं.सोलापूर अधिवेशनाच्या निमित्तान मुंबईच्या संग्राम नावाच्या दैनिकानं विशेष पुरवणी काढली होती.त्यानंतर भरलेली काही अधिवेशनं आणि त्यांचे अध्यक्ष पुढील प्रमाणं होती.श्री.शं.नवरे (प्रभात,नागपूर 1946),पा.वा.गाडगीळ ( लोकमान्य,सांगली 1949) प्र,के,अत्रे ( नवयुग,बेळगाव 1950) ,प्रभाकर पाध्ये ( नवशक्ती,कोल्हापूर-1952) ह.रा.महाजनी ( लोकसत्ता,मुंबई-1953) राम निसळ ( आझाद,मुंबई 1962) अनंत भालेराव (मराठवाडा,नगर 1963),बाबुराव जक्कल ( सोलापूर समाचार,चंद्रपूर 1964) बाबूराव ठाकूर ( तरूण भारत,जळगाव-1965) अनंतराव पाटील ( औरंगाबाद-1967),कांतिलाल गुजराती( नाशिक,1968),द.शं.पोतनीस (पणजी,1969),वसंत काणे (संध्या,श्रीक्षेत्र परशूराम1971),बाळासाहेब मराठे ( श्रीक्षेत्र पंढरपूर,1973)रंगअण्णा वैद्य ( संचार,मुंबई-1977)

मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापनेनं काय साध्य झालं असा प्रश्न तेव्हा आणि आजही विचारला जातो.परिषदेच्या स्थापनेमुळे पत्रकारांमध्ये एकोपा निर्माण झाला,आपल्या बरोबर आपल्या संघटनेचं बळ आहे याची जाणीव निर्माण झाली ही परिषदेची मोठी फलनिष्पत्ती असल्याचं दिसतं.तो काळ असा होता की,वृत्तपत्रांमध्ये मोठी व्यावसायिक स्पर्धा तर होतीच त्याच बरोबर मालक असतील किंवा संपादक असतील त्यांच्यात प्रतिस्पर्धी वर्तमानपत्राबद्दल आकस आणि अढी असायची.  याला वृत्तपत्रांची धोरणं जशी कारणीभूत असत त्याचबरोबर व्यक्तिगत राग-लोभांचीही एक किनार असायची.त्यामुळं एकत्र येणं,विचार विनिमय करणं शक्य व्हायचं नाही.परिषद स्थापन झाल्यानंतर आणि परिषदेची अधिवेशनं भरायला लागल्यामुळं पत्रकारांच्या मनातील परस्पर व्देष,अढी,मतभिन्नता दूर झाली आणि राज्यातील पत्रकार समव्यावसायी या भूमिकेतून एकत्र यायला लागले.संघटीत होणं म्हणजे सामर्थ्यवान होणं आहे याची जाणीव त्यांना झाली परिषदेमुळं राज्याभरातील पत्रकारांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला.परिषदेच्या 75 वर्षांच्या वाटचालीत हेच स्वरूप कायम राहिलं, आज पत्रकारांनी वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या असल्या तरी मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिषेदेचं आपण सदस्य असावं असं बहुसंख्य पत्रकारांना वाटतं हीच परिषदेच्या कामाची पावती आहे असं मला वाटतं.जी संघटना काकासाहेब लिमयेंनी बांधली,जी अनंत काणेकर,पुरोहित , आचार्य अत्रे,देवगिरीकर,पा.वा.गाडगीळ आणि अशाच अनेक ज्येष्ट,श्रेष्ठ पत्रकारांनी उभी केली,तिच्यासाठी दिवस-रात्रं एक केला त्यासंघटनेचा सदस्य असणं हे पत्रकाराला अभिमानाचं वाटतं हेच परिषदेचं यश आहे.आज देशभरातील 8 हजारावर पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले आहेत ही फार महत्वाची गोष्ट आहे.सर्वसमावेशक स्वरूप असलेली आणि एवढा आणि तळागाळातील पत्रकारंापर्यत पोहोचलेली परिषेदेसारखी देशात दुसरी संघटना नाही.परिषद आपली 75 वर्षे पुर्ण करीत असताना या संघटनेची अशीच भरभराट व्हावी अशीच माझी भावना आणि प्रार्थना आहे.परिषदेच्या वाटचालीत अनेक अडचणी आल्या पण परिषद प्रत्येक संकटातून तावूनसुलाखून निघाली ती पत्रकारांच्या पाठिंब्यामुळंच.मराठी पत्रकार परिषद हो कोणा एकाची नाही ती,देशातील तमाम मराठी पत्रकारंाची आहे.त्यामुळं साऱ्याचं सहकार्य,पाठबळ परिषदेला मिळालं पाहिजे अशी  असंच  वाटतं.

परिषदेच्या पुढाकारानेच झाली मुंबई संघाची स्थापना 

3 डिसेंबर 1939 रोजी मराठी पत्रकार परिषदेची रितसर स्थापना झाल्यानंतर मुंबईसह राज्यात परिषदेशी संलग्न असे पत्रकार संघ स्थापन कऱण्यास सुरूवात झाली होती.त्यादृष्टीनं पहिला प्रय़त्न मुंबईत झाला आणि 1941 मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाची स्थापना केली गेली. त्या अगोदरपासून मुंबईतील पत्रकार संघटना स्थापन कऱण्याच्यादृष्टीनं प्रय़त्न करीत होते.1934 मध्ये “साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळ” या नावाने स्थापन झालेल्या एका संस्थेच्या बैठकात पत्रकारांची संघटना स्थापन करण्याच्या दृष्टीनं चर्चा तर व्हायची पण विषय त्यापुढं सरकायचा नाही.पुढं 1939 मध्ये दुसरे जागतिक महायुध्द पेटले.तेव्हा 1941च्या एप्रिल महिन्यापासून मुंबईतील पत्रकार केवळ स्नेहभावनेनं आणि पत्रकारितेच्या व्यवसायावर चर्चा करण्यासाठी एकत्र यायचे.तेथेही “मुंबईतील पत्रकारांनी संघटित व्हायला हवं” असा सूर व्यक्त व्हायचा.त्याच वेळेस मराठी पत्रकार परिषदेनेही राज्यभर परिषदेच्या शाखा सुरू कऱण्याचा निर्णय घेतला होता. मे 1941 साली पुण्यात परिषदेचं अधिवेशन भरलं होतं.त्याचे अध्यक्ष होते न.र.फाटक.ते अध्यक्ष झाल्याबद्दल मुंबईतील पत्रकारांनी फाटक यांचा सत्कार कऱण्याचं ठरविलं होतं.त्यासाठी फोर्टमधील तांबे उपहारगृहात सर्व पत्रकार एकत्र जमले होते.तेथेच मुंबई मराठी पत्रकार संघ स्थापन कऱण्याचं ठरलं.तो दिवस 21 जून 1941 हा होता.हाच संघाचा स्थापना दिवस ( मात्र काही ठिकाणी ही तारीख 22 जून असल्याचं म्हटलेलं आहे असे मा.कृ.शिंदे यांच्या ‘मराठी वृत्तपत्र व्यवसाय इतिहास व शास्त्र’ या पुस्तकात म्हटले आहे.या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1976 मध्ये प्रसिध्द झाली आहे.) न.र.फाटक हेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होत.1942-43सालासाठी झालेल्या निवडणुकीत य.कृ.खाडिलकर हे अध्यक्ष म्हणून निवडून आले.1943-44 च्या कार्यकारी मंडळाने संघाची घटना छापून प्रसिध्ध केली.यात संघाचे उद्देश नमुद केले आहेत.त्यानुसार 1) मुंबईतील पत्रकारांची संघटना स्थापन करून त्यांची आर्थिक,बौध्दिक आणि व्यावसायिक उन्नती करणे,2) पत्रकारांसंबंधात वेळोवेळी उप्तन्न होणाऱ्या प्रश्नांबाबत मत व्यक्त कऱणे 3) सामान्यतः पत्रकारांच्या हितसंबंधाचे रक्षण व पत्रकारातील स्नेहसंबंध ,संघटना आणि सामर्थ्य वाढविण्यासाठी पत्रकारांच्या सभा संमेलने वगैरे भरविणे 4) मुद्रण स्वातंत्र्याचे रक्षण कऱणे 5) विद्यापीठातून किंवा अन्यत्र वृत्तपत्र शिक्षणाची व्यवस्था कऱणे,ग्रंथालय काढणे,पुस्तकं प्रसिध्द कऱणे आणि बौध्दिक वाढीसाठी आवश्यक ते सारे उपाय करणे.आदि बाबींचा यात समावेश आहे.त्यानंतर 18 मे 1975 च्या सर्वसाधारण सभेत घटना दुरूस्ती कऱण्यात आली.मुंबईत संघाची स्वतःची जागा असावी,तेथे ग्रंथालय सुरू करावे अशी संघाची पहिल्यापासून इच्छा होती.कालांतरानं ती सफल झाली.तत्पुर्वी संघाकडं स्वतःची मठी नव्हती.त्यामुळं पाठीवर आपला संसार घेऊन संघाचं काम चालायचं.मात्र  सरकारनं डिसेबर 1970 मध्ये एन्सा हटमेंट आझाद मैदान येथे एक बैठी छोटीशी जागा मुंबई मराठी पत्रकार संघाला दिली. त्याच प्रमाणे कर्जत नजिक विश्वनगर येथ संघाने विश्रामगृह बांधले होते.साळसकर नावाच्या दानशूर व्यक्तीने ही जागा संघाला दिली होती.या जागेचं आणि तेथील वास्तूचं पुढं काय झालं याचं गुढ आहे.त्यानंतर संघानं दि.गो.तेंडूलकर मंदिर लोणावळा ही वास्तू उभी केली.संस्थेकडं आता बऱ्यापैकी स्थावर मालमत्ता झाली होती.त्यामुळं घटनेतील तरतुदीनुसार एक विश्वस्त मंडळ नियुक्त कऱण्यात आलं.तीन सदस्याचं हे विश्वस्त मंडळ आहे.संघाच्या घटनांमध्ये वेळोवेळी दुरूस्तया झाल्या.मुंबई मराठी पत्रकार संघाची स्थापना परिषदेच्या प्ररणेनं आणि परिषद पदाधिकाऱ्यांच्याच पुढाकारानं झाली आहे.त्यामुळं दीर्घकाळ या दोन्ही संस्था हातात हात घालूनच काम करीत .मात्र नंतर काही पदाधिकाऱ्याचे व्यक्तिगत रागलोभ,हेवेदावे आणि महत्वाकांक्षेमुळे अजय वैद्य संघाचे अध्यक्ष असताना परिषदेशी संबंध तोडण्याची भूमिका संघानं घेतली.त्याचं ठोस कारणही काही नव्हतं.संघाची आजची वास्तू ज्या जागेत आहे तेथे मराठी पत्रकार परिषदेचं कार्यालय होतं.सरकारनं नवं पत्रकार भवन बाधण्यासाटी संघाला जास्तीची जागा देण्याचा निर्णय़ घेतला तेव्हा परिषदेची जागा सरकारनं ताब्यात घेऊन युवक बिरादरी शेजारच्या गॅरेजमध्ये जागा दिली.ती जागा सोडताना पत्रकार संघानं वास्तू बांधून पूर्ण होताच परिषदेला 250 चौरस फुटाची जागा द्यावी असा करार झालेला होता.त्या ंसंबंधीचा लेखी आदेश सरकारनं दिल्यानंतरही संघानं परिषदेला ही जागा दिलेली नाही.

मुंबई संघाची स्थापना झाल्यानंतर मुंबईतील पत्रकारांना हक्काचं व्यासपीठ मिळालं.या संघटनेच्या माध्यमातून नंतरच्या काळात सीमा लढा असेल किंवा आणीबाणीविरोधी आवाज उठविण्याची भूमिका असेल समर्थपणे पार पाडलेली आहे.मुंबई मराठी पत्रकार संघानं विविध उपक्रम राबविले आहेत.सरकार दरबारी वज न असल्यानं संघाचं अध्यक्षपद हे प्रतिष्ठेचं समजलं जातं.मराठी पत्रकार परिषद,1939,श्रमिक पत्रकार 1940 आणि मुंबई मराठी पत्रकार संघ 1941 मध्ये स्थापन झाल्यानंतर राज्यातील पत्रकार खऱ्या अर्थानं संघटीत झाले.या संघटनांच्या माध्यमातून पत्रकारांनी अनेक लढे लढविल्याचे दिसते.

पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ 

पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाची स्थापना नेमकी कधी झाली त्याची माहिती उपलब्ध नसली तरी पत्रकार संघाच्या जुन्या लेटरहेड वरून असं अनुमान काढता येईल की,जिल्हा पत्रकार संघ 1972मध्ये स्थापन झालेला असावा.या संघांची धर्मदाय आय़ुक्तांकडं देखील नोंदणी झालेली असून त्याचा नोंदणी क्रमांक एफ.597 पुणे दिनांक 05-08-1972 आणि एम.ए.एच.744 पुणे दिनांक 29-04-1972 असा आहे.संघाची घटना 26-10-1974च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वीकृत करण्यात आली आहे.संघाचे कार्यक्षेत्र पुणे जिल्हयापुरते मर्यादित असून संघाचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे.हा संघ मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न आहे.1976-77 सालचे कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे होते.अध्यक्ष-व्दा.पा.लेले (सकाळ ) कार्याध्यक्ष -मधुकर जोशी ( मराठी) चिटणीस-न.म.जोशी( एकता) कोषाध्यक्ष- पु.शं.पत्की ( स्वंतंत्र व्यवसायी पत्रकार ).कार्यकारिणीतील सदस्य.मो.म.आगरवाल,ना.तू.ठाकूर,बा.पा.शाळीग्राम,स.ह.देशपांडे.स.आ.जकाते,यमाजी गुरव.जिल्हा पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष शरद पाबळे( सकाळ) असून कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे आहेत.जिल्हा संघाच्या प्रत्येक तालुक्यात शाखा स्थापन झालेल्या आहे.पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यालय जुन्या जिल्हा परिषदेसमोर आहे.

 अशी झाली,रायगड जिल्हा मराठी 

पत्रकार संघाची स्थापना

मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाल्यानंतर टप्प्याटप्पयानं प्रत्येक जिल्हयात परिषदेच्या शाखा स्थापन होत गेल्या.आरंभीच्या काळात ज्या जिल्हयात या शाखा स्थापन झाल्या त्यात रायगडचा समावेश आहे.24 मार्च 1953 रोजी मुंबईत मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन लोकसत्ताचे ह.रा.महाजनी यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं.या अधिवेशनात वृत्तपत्रांना देण्यात देण्यात येणाऱ्या जाहिरातीबाबत तत्कालिन सरकारने अवलंबिलेल्या धोरणाबाबत तीव्र नापंसती व्यक्त कऱण्यात आली होती.( – म्हणजे जाहिरातीबाबतचा सरकारचा नकारात्मक दृष्टीकोन 53 पासूनचा आहे.त्यात आजही बदल झालेला नाही)तसा ठरावही एकमताने संमत करण्यात आला होता. या अधिवेशनासाठी विविध जिल्हयातून पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.रायगडमधूनही पत्रकार अधिवेशनासाठी उपस्थित होते.त्या काळी रायगडमधून कुलाबा समाचार,नवकृषीवल,राष्ट्रतेज यासारखी वृत्तपत्रे प्रसिध्द होत.या शिवाय बाहेरची काही वृत्तपत्रे रायगडात येत असत.त्यामुळे जिल्हयातील बहुतेक जिल्हयात पत्रकार होते.मात्र ते संघटीत नव्हते.परिषदेच्या अधिवेशनासाठी कुलाबा समाचारचे वि.वि.मंडलिक आणि नव कृषीवलचे ना.ना.पाटील अधिवेशनासाठी गेले होते.परिषदेत ज्या ठिकाणी अजून संघ स्थापन झालेले नाहीत तेथे ते त्वरित स्थापन करण्यासाठी प्रयत्न कऱण्याचे आवाहन करण्यात आले.त्यामुळे मंडलिक आणि ना.ना.पाटील यांनाही आपल्या जिल्हयात पत्रकार संघटना स्थापन झाली पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागले.त्याचं प्रतिबिंब नवकृषीवलच्या 6 एप्रिल 53 च्या अग्रलेखात उमटलेलं दिसेल.कृषीवलकारंानी अधिवेशनाचा वृत्तांत तर दिलेलाच आहे त्याचबरोबर आपलं स्पष्ट मतंही नोंदविलं आहे.तसंच जिल्हयातील पत्रकारंानी संघटीत होण्याची गरजही त्यानी प्रतिपादन केलेली आहे.त्यानंतर मधले पाच-सहा वर्षे संघटना स्थापन कऱण्याच्यादृष्टीने काही हालचाल झाल्याचे दिसत नाही.मात्र 17 जून 1959च्या कुलाबा समाचारच्या अंकात एक पत्र प्रसिध्द झाले आहे.त्यात पत्रकारांच्या पुढच्या समस्या आणि संघटनात्मकबाबींवर च र्चा कऱण्यासाठी पत्रकारांनी एकत्र येण्याबाबत आवाहन क रण्यात आले होते.त्या पत्रात म्हटले होते की,कुलाबा जिल्हयात असलेले पत्रकार,बातमीदार हे आतापर्यतच्या इतिहासात केव्हाही एकत्र जमले,व त्यांनी आपल्या व्यवसायातल्या प्रश्नांची च र्चा केली व एकमेकांचा निकट परिचय करून घेतला असं घडलेलं नाही.त्यांनी एकत्र येणं हे त्यांच्या व्यवसायाच्यादृष्टीनं जिल्हयाच्या हिताच्यादृष्टीनं आणि पत्रकाराचंी उच्च पातळी राखून समाजातील या माननीय व्यवसायाची प्रतिष्ठा राखणे या दृष्टीनं अत्यंत हितावह होईल.वरील सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही जिल्हयात असलेल्या या व्यवसायातील सर्व पत्रकार मित्रांची एक बैठक घ्यावी असे सुचवित आहो.याबाबत आपले विचार मांडल्यास आम्ही उपकृत होऊ.यानंतर बैठकीची जागा तारीख आणि वेळ सर्वांच्या सोयीनुसार ठरविण्यात येईल.तरी सदरची बैठक जुलै मकिन्यात पेण येथ घेतल्यास ते सर्वांसाठी सोयीचे ठरेल असे वाटते.हे सर्वांना मान्य होईल अशी अपेक्षा आहे.आपल्याकडून उत्तराची अपेक्षा करतो.पत्रव्यवहार संपादक राष्ट्रतेज अलिबाग या पत्त्यावर करावा असे आवाहन कऱण्यात आले होते.या पत्राच्याखाली राष्ट्रतेजचे संपादक ह.वा.महाजन,नवकृषीवलचे संचालक ना.ना.पाटील,लोकमित्रचे प्रतिनिधी ग.वा.भडकमकर आणि कुलाबा समाचारचे वि.वि.मंडलिक यांची नावं होती.

– सर्व ज्येष्ठ संपादकांनी केलेल्या या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला.त्यानुसार जिल्हयातील पत्रकारांची एक बैठक 19 जुलै 1959 रोजी दुपारी 1 वाजता पेण नगरपालिकेच्या सभागृहात झाली.या बैठकीस मार्गदर्शन कऱण्यासाठी मुंबईचे प्रतिथयश पत्रकार श्रीपाद शंकर नवरे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं अशी अपेक्षा होती.मात्र ते येऊ न शकल्यानं जिल्हयातील ज्येष्ठ पत्रकार कुलाबा समाचारचे संपादक वि.वि.मंडलिक यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.बैठकीत जिल्हयातील थोर पत्रकार दे.भ.रामभाऊ मंडलिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त कऱणारा ठराव संमत करण्यात आला होता.त्यानंतर प.रा.दाते,श्रीकृष्ण रानडे,साथी दत्ता फडके,ना.ना.पाटील,मा.के.सहस्त्रबुध्दे ,द.ना.पाटील,बाबुराव पळणीटकर,आदर्शचे ग.भा.पंडित,यांची भाषणे झाली.ना.ना.पाटील यांनी आपल्या भाषणात पत्रकार म्हणून काम करताना आपल्या आयुष्यात कोणकोणती गंडांतरं आली,आपण आयुष्यभर सत्याचा कसा पाठपुरावा केला,निर्भयपणे अनेक कुलंगडी कशी चव्हाट्यावर आणली,शेतकरी सेवा हेच कसे आपले ध्येय आहे,आणि आपण नेहमीच पिडित आणि पददलित जनतेचा कसा पक्ष घेतला याची सविस्तर माहिती आवेशपूर्ण भाषेत प्रतिपादन केली. या सभेचे वृत्त देणारा मजकूर कुलाबा समाचारच्या 22 जुलै 1959च्या अंकात प्रसिध्द करून या बैठकीत संमत झालेले ठराव आणि झालेल्या भाषणाची माहिती प्रसिध्द केली होती.एक महत्वाची गोष्ट म्हणजे अन्य ठरावाबरोबरच पत्रकारांसाठी आचारसंहिता ग्रंथित कऱण्यात आली.याचा अ र्थ पत्रकारांसाठीच्या आचारसंहितेची गरज आजच भासते आहे अस नाही तर थेट 55 वर्षांपूर्वी देखील तत्कालिन पत्र पंडितांना याची गरज भासली होती याकडं दुर्लक्ष करता येणार नाही. – याच बैठकीत मराठी पत्रकार परिषदेच्या सूचनेप्रमाणे संघटनेचं नाव कुलाबा जिल्हा मराठी पत्रकार संघ कऱण्याचं ठरलं असावं.ही संस्था तेव्हा मराठी पत्रकार परिषदेची सलग्न असल्यानं संस्थेची नोंदणी धर्मदाय आयुक्तांकडे केली गेली नसावी..नंतर या संस्थेची नोंदणी केली गेली.परिषदेत किंवा बैठकीत जे ठराव संमत कऱण्यात आले होते आणि जे नि र्ण य घेतले गेले होते त्याची अंमलबजावणी घडवून आणण्यासाठी आणि पत्रकार संघाचे काम अखंडपणे सुरू राहावे यासाठी वि.वि.मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली एक स्थायी समितीही नियुक्त कऱण्यात आली होती.अशा प्रकारे पत्रकार संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली.नंतर विसुभाऊ मंडलिक, प्रभाकर पाटील, हरिभाऊ महाजन यांनी आरंभीच्या काळात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. नंचक मीनाक्षी पाटील, माघवराव मंडलिक ,नवीन सोष्टे,आणि आता सुप्रिया पाटील हे पत्रकार संघाचे अध्यक्ष झाले. 18 – 4-86 रोजी मीनाक्षी पाटील अध्यक्ष अघ्य़क्ष झाल्या.त्यांचा सत्कार विद्याधर गोखले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या काळातच पत्रकार संघाची इमारत उभी राहिली.त्यानंतर 5 जानेवारी 1990 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मीनाक्षी पाटील यांनी पत्रकार उभारणीचे आपले स्वप्न साकार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.या वास्तुला रामनारायण पत्रकार भवन असे नाव देण्यात आले.पत्रकार संघाने अनेक चांगले आणि सामाजिक उपक्रम राबविले आहेत.पत्रकार संघाच्यावतीनं पत्रकारितेचं प्रशिक्षण नव्या पत्रकारांना देता यावं यासाठी मुक्त विद्यापीठाचं अभ्यासकेंद्र एस.एम.देशमुख यांच्या पुढाकारानं सुरू कऱण्यात आलं.रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ हा पहिला संघ आहे की,ज्याला मुक्त विद्यापीठानं हे केंद्र दिलं होतं.त्या अगोदर केवळ शिक्षण संस्थानाच अशी केंद्र दिली जायची.मात्र एस.एम.देशमुख यांनी विद्यापीठाशी भांडून हे केंद्र अलिबागला आणलं आणि ते यशस्वी करून दाखविलं.त्यानंतर एस।एम.देशमुक यांच्या संकल्पनेतूच प्रभाकर पाटील वाचनाल्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.आज हे वाचनालय चांगलं चालू आहे.मात्र जर्नालिझमची जगभरातील सारी पुस्तकं या ग्रंथालयात असावीत ही एस.एम.देशमुख यांची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही.रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाला चांगली इमारत आहे.समुद्राच्या काठावर असलेली ही इमारत पत्रकार संघाचं वैभव आहे.गंमत अशी की,सरकारच्या कोणत्याही महेरबानीवर ही इमारत उभी नाही.सरकारनं या इमारतीसाठी जागा अ थवा नि धी दिलेला नाही.संघाने आपलय उत्पन्नाची साधनही निर्माण केलेली असल्यानं संघ आर्थिकदृष्याही सक्षम आहे.नागेश कुळकर्णी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघातर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात येतात.

एस.एम.देशमुख

१९३९ पासूनचे अध्यक्ष

मराठी पत्रकार परिषद अध्यक्षांची यादी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here