रायगडात एडस् हरतोय,,रायगड जिंकतोय..

0
813

रायगडात एडस् हरतोय,,रायगड जिंकतोय..

एडस् च्या  विरोधात उभारली गेलेली मोहिम,जनजागृती,एडस् प्रतिबंधक व नियंत्रण विभागाकडून सुरू असलेले सततचे प्रयत्न,विविध सामाजिक संस्थांकडून राबविले गेलेले उपक्रम आणि आजाराचे निदान झाल्यास त्यावर वेळेत होणारे उपचार यामुळं रायगड जिल्हयातील एडस् बाधितांची संख्या सहा वर्षात निम्म्यावर आल्याची सुखद बातमी आहे..’रायगड जिल्हयात  एडस् हरतो आहे रायगड जिंकतो आहे’ असं म्हणण्यासारखी स्थिती आहे.येत्या काही दिवसात रायगड एडस्  मुक्त होईल असा विश्‍वास एडस् प्रतिबंधक आणि नियंत्रण विभागानं व्यक्त केला आहे.

2011 मध्ये 31 हजार 464 संशयित बाधित रूग्णांची तपासणी करण्यात आली होती.त्यामध्ये 684 रूग्ण एचआयव्ही बाधित असल्याचे आढळून आले होते.2016 मध्ये 71 हजार 90 जणांची तपासणी केली गेली त्यामध्ये 404 रूग्ण एचआयव्ही बाधित असल्याचे आढळून आले होते.जानेवारी ते ऑक्टोबर 2017 या काळात झालेल्या तपासणीत 382 रूग्ण एचआयव्ही बाधित असल्याचे आढळून आले आहेत.याचा अर्थ 2011 च्या तुलनेत एचआयव्ही बाधित रूग्णांची संख्या निम्म्यापर्यन्त  खाली आलयाचे  दिसते। .भविष्यात देखील याच गतीने एडस् विरोधी मोहिम राबवून रायगड जिल्हा एडस् मुक्त करण्याचा संकल्प एडस प्रतिबंधक व नियंत्रण विभागानं केला आहे. आज जागतिक एडस दिन साजरा होत असताना रायगडमधील ही बातमी नक्कीच दिलासा देणारी आहे. ः

शोभना देशमुख अलिबाग रायगड 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here