आपल्या कामातून माहिती आणि जनसंपर्क विभागाला नवे आयाम मिळवून देणारे,माहिती आणि जनसंपर्कची पत,प्रतिष्ठा आणि लोकाभिमुखता वाढविणारे या विभागाचे भूतपूर्व महासंचालक अरूण मोरेश्वर पाटणकर यांचे आज 80व्या वर्षी निधन झाले.नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या सोबत मुंबईत असतानाच त्यांचे निधन झाले.अरूण पाटणकर हे 1973च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.विविध विभागात उल्लेखनिय कार्य केलेल्या पाटणकर यांनी माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक म्हणून उत्कृष्ट कार्य केले.पाटणकर निवृत्त झाल्यानंतर कालांतराने त्यांच्या कन्या मनिषा म्हैसकर देखील या विभागाच्या महासंचालक झाल्या होत्या.वडिल आणि मुलीने या विभागाची सूत्रे सांभाळल्याचा हा दुर्मिळ योग होता.जुन्या काळातील पत्रकार आजही त्याचं स्मरण करतात.पाटणकर यांना मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने भावपूर्ण श्रध्दांजली.–