संतोष पेरणे हा रायगड जिल्हयातील एक धडपडया पत्रकार.चांगला बातमीदार.बातमी कुठं आणि कश्यात आहे याचा वास त्याला बरोबर येतो.विविध सरकारी पुरस्कारांचा धनी.काल त्याला मृद आणि जलसंधारण विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवार विषयातील स्पर्धेतला कोकण विभागातला राजमाता जिजाऊ जलयुक्त पुरस्कार मिळाला.जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते हा पुरस्कार संतोष पेरणे यांना प्रदान करण्यात आला.संतोष पेरणे यांचं मनापासून अभिनंदन.असेच पुरस्कार त्याला मिळत राहोत.–