निर्णय प्रक्रिया केंद्रीत झालीयः शरद पवार 

0
810

देशातील निर्णय प्रक्रिया मर्यादित घटकांकडं केद्रीत झाली असल्याने लोकशाहीच्या अधिकारावर मर्यादा येत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कर्जत रायगड जिल्हयातील कर्जत येथे केली.

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकार्‍यांचे दोन दिवसीय चिंतन शिबिराचा आज पवारांच्या भाषणानं समारोप झाला.यावेळी बोलताना पवार यांनी  नोटाबंदी,महागाई,महामंदी,राज्य सरकारची कर्जमाफीवरून   केंद्र आणि राज्य सरकारवर सपाटून टीका केली.

देशातील एकाधिकारशाही वाढत असून अशी केंद्रीत झालेली सत्ता भ्रष्टाचाराच्या रस्त्याने जाते असा आरोप  करून पवार म्हणाले,सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई वाढत चालली आहे.शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. कृषी विषयक चुकीची धोरणं राबविली जात आहेत.आहेत.कर्जबाजारीपणा हे शेतकरी आत्महत्येचं कारण आहे.मात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.महाराष्ट्र सरकारनं जाहिर केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकर्‍यांचा अवमान आहे.दीर्घमुदती कर्जदार शेतकर्‍यांना या कर्जमाफीचा काहीच उपयोग झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला.राज्य सरकार खोटय जाहिराती छापून खोटे लाभार्थी दाखवत आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.

शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस भाजप सरकारला पाठिंबा देणार काय ?यावर मात्र शरद पवार यांनी स्पष्ट भाष्य केलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here