उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी पाच उमेदवांरी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने रायगड लोकसभा मतदार संघात आता 10 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
रायगड लोकसभा मतदार संघासाठी एकूण 17 उमेदवारांनी नामंाकन अर्ज दाखल केले होते.छाननीच्या वेळेस दोन अर्ज बाद झाल्याने 15 उमेदवारी अर्ज उरले होते.आज त्यातील पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 10 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात विविध राजकीय पक्षांचे आठ आणि अपक्ष दोन उमेदवार आहेत. शिवसेनेचे अनंत गीते,राष्ट्रवादीचे तटकरे सुनील दत्तात्रय,शेकापचे रमेशभाई कदम आणि आम आदमी पार्टीचे डॉक्टर अपरांती संजय शयवंत यांच्यात चौरंगी लढत होणार आहेत.
राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले सुनील श्याम तटकरे हे उमेदवार रिंगणात असून त्यांना पेनाची निब सात किरणांसह हे चिन्ह मिळाले आहे.हातावरील घड्याळ हे चिन्ह मिळावे यासाठी त्यांचा प्रय़त्न होता.