ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि थोर विचारवंत दत्ताजी ताम्हणे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. मुंलुंडच्या साईधन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र वयाच्या १०१ व्या वर्षी उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
वयाच्या आठव्या वर्षी लोकमान्य टिळकांना पाहिल्यानंतर आजन्म ब्रह्मचर्य पत्करुन आपलं आयुष्य देशसेवेला वाहण्याचा निर्णय दत्ताजी ताम्हणे यांनी घेतला होता. 1928 साली सायमन कमिशनच्या बहिष्काराच्या निमित्ताने ते आंदोलनाच सहभाही झाले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात ताम्हणे यांनी बराच काळ तुरुंगवासही भोगला.
देशातील स्वात्यंत्रपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही कालखंडाचे ताम्हणे प्रमुख साक्षीदार होते. सत्याग्रह, आंदोलनं, चळवळी, राजकारण, समाजकारण असं त्यांचं ध्येयासक्त जीवन राहिलं.