रायगडात दोन सुनील तटकरे

0
842

नामसाधर्म्य असलेला डमी उमेदवार उभा कऱणं ही रायगडच्या निवडणुकांची एक परंपराच झाली आहे. मागे दत्ता पाटील यांच्या नावाचे तीन उमेदवार एका निवडणुकीत उभे होते तर चक्क नऊ मीनाक्षी पाटील एकदा उभ्या होत्या.या ऩऊ मीनाक्षी पाटलांनी प्रत्येक हजार-बाराशे मतं घेतली होती.
अजून मतदान करताना उमेदवार गोंधळतो हे सत्य राजकीीय पक्षांना माहिती असल्यानेच लक्ष्मण जगताप,किंवा श्रीरंग मारणे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार मावळमध्ये रिंगणात आहेत.आता रायगडमध्येही शेकापने सुनील श्याम तटकरे नावाचा एक  उमेदवार उभा केला आहे.शेकापचे नेेते आमदार जयंत पाटील यांनी काल ही माहिती दिली.उमेदवार जाहीर झाला की,त्याच नावाचा माणूस जिल्हयात शोधला जातो.पाटील वगैरे नावं असलेली अनेक माणसं उपलब्ध होतात.पण तटकरे हे नाव अभावानेच दिसते.तरीही या नावाचा व्यक्ती शोधण्यात शेकापला यश मिळाले आहे.
शेकाप पुरस्कृत हा उमेदवार श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथील रहिवाशी असला तरी मुंबईतील खारपूर्व भागात त्यांचे वडा-पावचे दुकान आहे.त्यांना आता नुकत्याच स्थापन झालेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीकडून लोकसभेत जायचंय.संधीचा लाभ आणि कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आपण ही निवडणुक लढवत आहोत असं सुनील श्याम तटकरे यांनी सांगितलें.राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या नावाजवळच या तटकरेंचेही नाव आले तर काही मतांचा फटका तर पालकमंत्री सुनील तटकरे यांना नक्कीच बसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here