एकाच दिवशी तीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले

0
1274

शेतकरी आंदोलनाचं रिपोर्टिंग करताना काल राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या,त्यांना धक्काबुक्की केल्याच्या तीन घटना घडल्याचं समोर आलंय.यातील दोन प्रकरणात पोलिसांनीच पत्रकारांना मारहाण केल्याचे दिसून आलं आहे.

पहिला प्रकार पुण्यात आयबीएन-लोकमच्या हलिमा कुरेशी आणि व्हिडिओ जर्नालिस्ट निखिल करंदीकर यांच्या बाबतीत घडला.त्या बाजारातील परिस्थितीची माहिती घेत असताना त्यांना धक्काबुक्की केली गेली.
दुसरी घटना सांगलीत घडली ,कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा बाईट घेण्यासाठी आलेल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना पोलीस अधिकार्‍यांनी धक्काबुक्की करून माराहाण केली.कोणाची परवानगी घेऊन आला आहात काय तुम्ही बाईट घ्यायचा नाही अशी मग्रुरीची भाषा पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी वापरली..सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच वृत्तवाहिनी संघटनेनं या प्रकाराचा निषेध केला आहे.
तीसरा प्रकार नगरमध्ये घडला.रविवारी रात्री शेतकरी आंदोलनाची छायाचित्रं घेतली म्हणून लोकमतचे चिंचोली पाटील येथील प्रतिनिधी अन्सार शेख यांना पाोलिसांनी मारहाण केली आहे.नगर जिल्हयातील टाकळी काझी येथे जमावाने दुधाचे टँकर अडविले.योळी शिवसेनेचे शशिकांत गाडे तेथे गेले असता त्याना पोलिसांनी अटक केली.जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली.तसेच प्रवीण कोकोटे यांच्या गाडीचा पोलिसांनी पाठलाग केला.या सर्व घटनांचे छायांकन करीत असताना लोकमतचे चिचोटी पाटीलचे वार्ताहर अन्सार शेख यांनाही पोलिसांनी मारहाण केली आहे.
या तीनही घटनांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला असून या प्रकरणातील वार्ताहरांनी आपआपल्या पोलीस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यांर्गत गुन्हे दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.कायदा होऊनही हल्ले थांबत नाहती,पत्रकारही तक्रार करायला तयार होत नाही हे वास्तव समोर आलेलं आहे.–मराठी पत्रकार परिषद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीशी जोडल्या गेलेल्या सर्व पदाधिकार्‍यांना सूचित कऱण्यात येत आहे की,ज्या पत्रकारावर हल्ले होतील,अशा पत्रकारांच्या पाठिशी उभे राहून त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी.,गुन्हे दाखल झाल्याशिवाय हल्लेखोरांमध्ये कायद्याची भिती निर्माण होणार नाही हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here