मुंबईः मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणार्या विविध पुरस्कारांचे वितरण येत्या 25 जून रोजी नागपूर येथे करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.मा.गो.वैद्य यांनी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच अन्य 10 ज्येष्ठ आणि मान्यवर पत्रकाराचाही यावेळी गौरव करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेच्या पत्रकात देण्यात आली आहे.