पाटणमध्ये पत्रकारावर हल्ला

0
870

पत्रकारावर हल्ला, सव॓ थरातून निषेध पाटण दि.19

रस्त्याच्या निकृष्ट कामाचे सचित्र वृत्त प्रसिद्ध केल्याप्रकरणी पत्रकाराला घरी जाऊन ठेकेदाराने मारहाण केली. पाटण तालुक्यातील मोरगिरी येथे ही घटना घडली. पत्रकार किशोर गुरव यांना झालेल्या मारहाण प्रकरणी ठेकेदार संदीप चंद्रकांत कोळेकर रा.पेठशिवापूर (मोरगिरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाटण तालुका पोलीस ठाण्यात भादंवि 341, 323, 504, 506, 427 या कलमान्वये गुन्हे दाखल झाला आहेत. या भ्याड हल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. या ठेकेदाराला जास्तीत-जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, किशोर गुरव हे एका दैनिकासाठी वार्ताहर म्हणून काम करत आहेत. मोरणा विभागातील गोकूळ फाटा ते हुंबरणे जाणार्‍या रस्त्याचे काम संबधित ठेकेदाराने घेतले आहे. याबाबत पत्रकार किशोर गुरव यांनी संबंधित रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची बातमी बुधवारच्या अंकात प्रसिध्द केली. याचा राग आरोपी संदिप कोळेकर याला आला.

पत्रकार किशोर गुरव हे सकाळी पेठशिवापूर गावातील मेडीकल दुकानात निघाले होते. तेथील मदरसा शाळे शेजारील सार्वजनिक रस्त्यावर आरोपी संदीप कोळेकर हा पांढर्‍या रंगाची होंडासिटी गाडी घेवून आला.पत्रकार किशोर गुरव यांच्या गाडीला आडवी गाडी लावून गाडीतून खाली उतरून त्याने मारहाण केली. मारहाण का करता असे विचारले असता. त्याने तुम्हा पत्रकारांना मस्ती आली आहे. असले पत्रकार मी जगवतो तुझे संपादक कोण आहेत मी त्यांना सांगतो असे म्हणून आज लावलेल्या बातमीच्या कारणावरून डंपरखाली चिरडून ठार मारेन अशी धमकी दिली. व शिवीगाळ व दमदाटी केली. त्यावेळी पत्रकार किशोर गुरव यांनी पाटण पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक तपास हावलदार जगताप करत आहेत.

सर्वच स्तरातून जाहीर निषेध

आज झालेल्या पत्रकार किशोर गुरव यांना मारहाणी बाबत सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत दे आहे. पत्रकारांवर हल्ला करणार्‍या आशा या भ्याड प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.

पत्रकार संघाची एकजूट

पत्रकाराला मारहाण झाल्याचे वृत्त समजताच मराठी पत्रकार परिषद संलग्न सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक सुजीत आंबेकर व जिल्ह्यातील तमाम पत्रकार संघटनांनी आपापल्या परीने या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच या घटनेचा निषेध केला. यातून जिल्ह्यातील पत्रकारांची एकजूट दिसून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here