- गोविंदराव तळवळकर हे केवळ महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते असं नाही तर ते देशातील नामंवत इंग्रजी दैनिकाचे स्तंभ लेखकही होते.टाइम्स ऑफ इंडियातही ते लेखण करीत.महाराष्ट्र टाइम्स हे टाइम्स समुहाचे वृत्तपत्र.या पत्रांचे संपादक राहिलेल्या गोविंद तळवळकररांच्या निधनानंतर महाराष्ट्र टाइम्सनं तर भरभरून कव्हरेज दिलं आहे मात्र टाइम्स ऑफ इंडियानं पहिल्या पानावर अगदी तळाला चार ओळीची बातमी देऊन बोळवण केली आहे.या बातमीचं कंटिन्युशन पान दहावर दिलं गेलं आहे.टाइम्सनं आपल्याच समुहात 28 वर्षे संपादक राहिलेल्या एका ज्येष्ठ पत्रकारांबद्दल दाखविलेली ही कंजुषी नक्कीच दुःख वाटावी अशी आहे.मराठी पत्रकार असोत,मराठी नेते असोत,मराठी कलावंत असोत यांच्या बातम्या देताना टाइम्सनं नेहमीच शब्द कंजुषी दाखविली आहे.सर्व सामांन्य वाचकांना जी बातमी पहिल्या पानाची नाही असे वाटते अशा असंख्य बातम्या टाइम्सच्या पहिल्या पानावर विस्तारानं झळकत असतात.मात्र गोविंदाराव तळवळकरांची बातमी पहिल्या पानावर चार ओळीची दिली जाते याचं दुःख किमान मराठी पत्रकारांना नक्कीच झालेलं आहे.