‘सबका साथ सबका विकास’ असा नारा देणार्या भाजपनं युपीत एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही.त्यानंतरही भाजपनं जेव्हा अभूतपूर्व यश संपादन केलं तेव्हाच भाजपची युपीच्या मुख्यमंत्रीपदाची पसंती योगी आदित्यनाथ हे असू शकतात अशी चर्चा सुरू झाली होती.ती आज खरी झाली.
योगी युपीसारख्या प्रभावी राज्याचा कारभार कसा चालवतील,तेवढी पात्रता त्यांच्याकडंं आहे की नाही हे तपासावे लागणार असले तरी ते भडकावू भाषणे देण्यात माहिर आहेत असं म्हणावं लागेल.भाजपनंही त्यांचा हाच गुण हेरून युपी सारखे मोठे राज्य त्यांच्या स्वाधिन केलेले दिसते.योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन जाण्यात सहाय्यभूत ठरलेली हीच त्यांची पाच वक्तव्ये असावीत असे मला वाटते.
1) दादरी हत्याकांडानंतर योगी आदित्यनाथ यांनी तत्कालिन कॅबिनेट मंत्री आजमखान यांच्यावर निशाणा साधत त्यांची मंत्रिंमडळातून हकालपट्टी कऱण्याची मागणी केली होती.आझम खान यांच्यावर अनेक आरोप केले होते.
2) ऑगस्ट 2014 मध्ये योगी आदित्यनाथ यांचा लव जिहादबद्दलचा एक वादग्रस्त व्हिडीओ समोर आला होता.त्यात दोन समाजात तेढ निर्माण करणारी अनेक विधानं होती.
3)फेब्रुवारी 2015 मध्ये योगी आदित्यनाथ वादग्रस्त वक्तव्य करताना म्हणाले होते,’परवानगी मिळाली तर देशातील सर्व मशिदीत गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करू’
4) योगाबद्दल बोलताना ते म्हणाले होते की,जी व्यक्ती योगाला विरोध करते तिने भारतातून चालते व्हावे,जे सूर्य नमस्कार मानत नाहीत त्यांनी समुद्रात उडी घेतली पाहिजे
5) एप्रिल 2015 मध्ये हरिव्दारमधील ‘हर की पौडी’ मंदिरात गैर हिदूंना प्रवेश देण्यास त्यांनी विरोध केला होता.त्यानंतर राज्यात मोठा गोंधळ माजला होता.