आणखी एका तरूण पत्रकाराचे आकस्मित निधन
हसळा प्रेस क्लब चे अध्यक्ष अमोल जंगम यांचे ऋदय विकाराच्या तिव्र धक्क्याने दुःखद निधन”*
म्हसळा प्रेस क्लब चे अध्यक्ष अमोल जंगम यांचे वयाच्या 32 व्या वर्षी ऋदयविकाराच्या तिव्र धक्क्याने आज सायंकाळी 6.45 वा. दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,आई वडील,तीन भाऊ व पाच वर्षाचा मुलगा आहे.आज सायंकाळी साडे पाच वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते स्वतः डॉक्टर कडे जात होते,पेट्रोल टाकण्यासाठी साठी पेट्रोल पंपावर चक्कर येऊन पडले तेथून त्यांना रिक्षातून घरी आणले.त्यातून त्यांना बरे वाटले.पुन्हा थोड्या वेळाने अस्वस्थ वाटू लागल्याने डॉ.मेथा यांच्या दवाखान्यात उपचारार्थ हलविण्यात आले.पुढे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांना रोहा येथे उपचारासाठी नेत असता म्हसळा पोलिस चेक पोस्ट सोडून ढोरजे गावानजिक त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच लोकांच्या रांगाच्या रांगा त्यांच्या निवास स्थानाकडे लागल्या,संपुर्ण तालुक्यावर दुःखाची छाया पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांचे अंतिम संस्कार त्यांच्या मूळ गावी तोंडसूरे येथे दिनांक 1७ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे.मराठी पत्रकार परिषदेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली