रायगड जिल्हयात राष्ट्रवादी कॉग्रेसला आणखी एक हादरा बसला असून जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस जनार्दन पाटील यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे.जनार्दन पाटील यांचे जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपावरून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी मतभेद झाले होते.जनार्दन पाटील कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट झाले नसले तरी ते शिवसेनेचा प्रचार करतील अशी चर्चा आहे. जनार्दन पाटील यांच्या पत्नीला कुरूळ पंचायत समितीचे तिकीट पक्षानं दिले होते पण जनार्दन पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे.अलिबाग तालुक्यातील विजय कवळे,राजा केणी हे नेते अगोदरच पक्ष सोडून गेले आहेत आता जनार्दन पाटील यानीही पक्ष सोडल्यानं पक्षाला मोठा धक्का बसला आहे.-