बीड जिल्हयातील 300वर पत्रकार परिषदेबरोबर…

0
1196
बीड जिल्हयातील पत्रकारांचे संघटन भक्कम करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने सुरू केलेल्या प्रयत्नास जिल्हयातील पत्रकारांनी जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तमाम पत्रकारांचा मी आभारी आहे.सदस्य नोंदणीचा आज शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत 300वर पत्रकारांनी सदस्य म्हणून आपली नोंदणी केली असल्याची माहिती मला मिळाली आहे..यामध्ये जिल्हयातील ग्रामीण पत्रकारांबरोबरच ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ संपादकांचाही समावेश आहे.जे कधीही कोणत्याही संघटनेचे सदस्य झालेले नव्हते असे मान्यवर संपादक प्रथमच परिषदेच्या कुटुंबात सहभागी झाले आहेत त्याचा मनस्वी आनंद परिषदेचा अध्यक्ष या नात्यानं मला आहे..सव॓ बीडकर सदस्यांचे परिषदेच्या परिवारात हादि॓क स्वागत. जिल्हयात प्रथमच एवढया मोठ्या संख्येनं पत्रकार परिषदेशी जोडले गेले आहेत.आमच्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्हयातील पत्रकारांनी आमच्यावर जो विश्‍वास दाखविला आहे त्यास तडा जाणार नाही याची मी स्वतः काळजी घेईल हे येथे मी नम्रपणे नमुद करू इच्छितो.
 
सदस्य नोंदणीसाठी आपले विभागीय सचिव अनिल महाजन,अधिस्वीकृती समितीचे सदस्य अनिल वाघमारे,परिषद प्रतिनिधी अतुल कुलकर्णी तसेच अस्थाई समितीतील सदस्य सुभाष चौरे ,भास्कर चोपडे, दत्ताञय अंबेकर, पोपट कोल्हे, छगन मुळे या सदस्यांनी जे अपार प्रयत्न केले,योगदान दिले अशा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.तसेच सदस्य नोंदणी मोहीम यशस्वी करण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे.अशा सर्वांचा मी आभारी आहे.हीच एकजूट भविष्यात कायम ठेवत राज्यातील एक आदर्श पत्रकार संघ म्हणून बीड जिल्हा मराठी पत्रकार संघ नावारूपास येईल असा विश्‍वास वाटतो
 
लवकरच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवडयात निवडणुका व्हाव्यात अशी योजना आहे.देशात प्रथमच ऑनलाईन पध्दतीनं मतदान घेण्याचा पयोग बीडमध्ये राबविला जात आहे.त्या अर्थानं या निवडणुका ऐतिहासिक ठरणार आहेत.ऑनलाईन निवडणुका घेणारी यंत्रणा बीडमध्ये येऊन मतदान कसे करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवेल.यावेळी जिल्हयातील सर्वच पत्रकारांना उपस्थित राहता येणार नसल्यानं हे प्रात्यक्षिक फेसबुकवर लाइव्ह दाखविले जाईल ज्यायोगे जिल्हयातील सर्व पत्रकारांना ते एकाच वेळी पाहता येईल.निवडणुकांसाठी एक स्थानिक निवडणूक अधिकारी नेमला जाईल,एक सहाय्यक निवडणूक अधिकारी असेल.त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिषदेच्यावतीने पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे यांना पाठविण्यात येईल.नवी टीम ही केवळ दोन वर्षांसाठीच असेल.बीड जिल्हयात जे सदस्य झालेले आहेत त्यांना मराठी पत्रकार परिषदेच्या ऑगस्ट 2017 मध्ये होणार्‍या निवडणुकांत सहभागी होऊन मतदान करता येणार आहे,ही बाबही उल्लेखनिय आहे.
 
.धन्यवाद
 
एस.एम.देशमुख
 
अध्यक्ष तथा मुख्य विश्‍वस्त
 
मराठी पत्रकार परिषद,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here