समाजासमोरील प्रश्नांचा गुंता आणि व्याप्ती वाढत असताना पत्रकारांनी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांची दुःख कमी करण्यासाठी आपल्या हातातील लेखणीचा प्रभावीपणे वापर करावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी केले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत रायगडच्या पत्रकारांनी मुंबई-गोवा महामार्गासाठी दिलेला लढा किंवा सेझ विरोधी लढयाचा गौरवपूर्ण उल्लेख करीत देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी हा पत्रकारितेचा आत्मा असून ते जोखड आहे असे पत्रकाराला कधीही वाटता कामा नये असे मत व्यक्त केले.
पेण प्रेस क्लबच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात देशमुख बोलत होते.पेण तालुक्यात पत्रकारिता,आध्यात्म,क्रीडा,शिक्षण,साहित्य,सामाजिक कार्य आदि क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या मान्यवरांना देशमुख यांच्या हस्ते सन्मानित केले गेल.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर तसेच माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळी ः दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीचे रायगड प्रतिनिधी दीपक शिंदे यांचा त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल एस.एम.देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तेव्हाचे छायाचित्र .