रायगड जिल्हयातून जाणार्या मुंबई-गोवा,मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि द्रुतगती मार्गासह जिल्हयातील विविध रस्त्यांवर दररोज तीन अपघात होतात आणि त्यात सरासरी तीन जण जखमी होतात तर दर दीड दिवसाला एक व्यक्ती रस्ता अपघातात मृत्युमुखी पडत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर आलं आहे.गेल्या दहा महिन्यात जिल्हयात 1 हजार 61 अपघात झाले.त्यात 1 हजार 92 लोक जखमी झाले असून 237 जण मृत्युमुखी पडले आहेत.वाढती वाहन संख्या,खराब रस्ते,ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न,रस्त्याचे सुरू असलेली कामं,तसेच अतिवेग आदि कारणांनी अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.-