शेकापला मनसेचा पाठिंबा

0
797

रायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघात शेकापच्या उमेदवारांना आता मनसे पाठिंबा देणार असल्याने या दोन्ही मतदार संघातील लढती रंगतदार होणार आहेत.शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली.आमटी चर्चा सकारात्मक झाली असून मनसेने आमच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे जयंत पाटील यांनी नंतर माध्यमांना सांगितले.आमच्यातील मतभेदाचे किरकोळ मुद्दे आता दूर झालेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

रायगडमधून शेकापने रमेश कदम आणि मावळमधून लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे.रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे अनंत गीते निवडणूक लढवत आहेत तर मावळमधून सेनेच्यावतीने श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीच्यावतीने राहूल नार्वेकर निवडणूक मैदानात आहेत.
रायगडमध्ये मनसेचा फारसा प्रभाव ऩसला तरी जी काही थोडीफार मतं आहेत ती शेकापच्या उमेदवारांना पडणार असल्याने शेकाप नेत्याच्या आशा पल्लवित झाल्या आङेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here