अलिबाग नजिकच्या मांडवा बंदरात मेटल डिटेक्टर आणि स्कॅनर बसविण्यात येणार आहे त्यासाठी रायगड पोलिसांकडून अहवाल मागविला असल्याची माहिती मेरिटाइम बोर्डाच्या सूत्रांनी दिली.गेटवे अॅाफ इंडियावरची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.त्याच धर्तीवर महत्वाच्या बंदरावरील सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात येणार आहे.1993 मध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि 26-11 चा हल्ला समुद्र मार्गेच झाला होता.या पार्श्वभूमीवर समुद्रातील सुरक्षा व्यवस्था कडक केली जात आहे.मांडवा बंदरातून दररोज हजारो प्रवासी मुंबई-मांडवा असा प्रवास करीत असतात.
(Visited 75 time, 1 visit today)