एक दिवस स्वतःसाठी…
पुण्यातील तरूण पत्रकार राहूल कलाल,
पुरंदरचे पत्रकार शमीम अत्तार ,
अलिबाग येथील तरूण पत्रकार रूपेश हुद्दार,
हवेलीची धनाजी लोढे,
सातार्याचे अरूण देशमुख,
हिमायतनगरचे सुनील तालेवार,
चिपळूणचे उत्तम जाधव
वर्ध्याचे अनिल मेघे
हे आणि आणखी असेच अनेक..
या सर्व पत्रकारांचे ह्रदयविकाराने किंवा तत्सम आजाराने अकाली निधन झाले..
ताण-तणाव,धावपळ,अवेळी जेवण,अवेळी झोप,या सर्वांचा पत्रकारांच्या आरोग्यावर पऱिणा होत असतो,
नियमित तपासणी केली नाही तर … आपण संकटाला आमंत्रण देत असतो.
अवेळी आणि अचानक पत्रकारांच्या होणार्या मृत्यूची संख्या सातत्यानं वाढत आहे.
म्हणूनच
मराठी पत्रकार परिषदेने आपल्या वर्धापन दिनी म्हणेज 3 डिसेंंबर रोजी दोन वर्षांपासून राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे सुरू केले आहे.
गल्या वर्षी हा उपक्रम सर्वत्र यशस्वी झाला.
यंदाही प्रत्येक जिल्हा,प्रत्येक तालुक्यातील पत्रकारांनी 3 डिसेंबर रोजी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून आपली प्रकृत्ती तपासून घ्यावी
आपण समाजासाठी वर्षभर धडपडत असतो
एक दिवस आपल्यासाठीही द्या ..
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित
पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी व्हा,
लक्षात ठेवा 3 डिसेंबर
विनित
मराठी पत्रकार परिषद,मुंबई