जनजागृती,सावधानता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे रायगड जिल्हयातील एचआयव्ही -एड्स बाधितांचे प्रमाण गेल्या 14 वर्षात 41 टक्क्यांवरून 8.50 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीला यश आले आहे.2002 पासून जिल्हयात एड्सच्या विरोधात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.जिल्हयात जानेवारी ते सप्टेंबर अशा नऊ महिन्याच्या कालावधीत 26 लाख 23 हजार 200 लोकसंख्ये पैकी 45 हजार 125 जणांची एचआयव्ही चाचणी करण्याचा लक्ष्यांक होता,प्रत्यक्षात 50 हजार 841 चाचण्या करण्यात आल्या आहेत.यामध्ये 275 म्हणजे केवळ 0.54 टक्के एचआयव्ही संशयित रूग्ण आठळल्याचे एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीच्या पत्रकात म्हटले आहे.येत्या काळात जिल्हयातील एड्स बाधितांचे प्रमाण शून्यांवर आणण्याचा समितीचा संकल्प असल्याचे पत्रकात नमुद करण्यात आले आङे.–